घनमूळ (Cube Root) :
जर x³ = p तर x ला p चे घनमूळ म्हणतात.
उदाहरणार्थ : 5³ =125 , 125 चे घनमूळ 5
घनमुळ दर्शविण्यासाठी ∛ हे चिन्ह लिहितात.
किंवा घातांक 1/3 लिहितात.
उदाहरणार्थ : 10 चे घनमूळ = ∛10 किंवा 10¹/³
∛(a³) = (a³)¹/³ = a
उदाहरणार्थ : ∛(5³) = (5³)¹/³ = 5
महत्त्वाचे नियम :
1) धन संख्येचे घनमूळ धन संख्या असते.
उदाहरणार्थ : ∛27 = 3
2) ऋण संख्येचे घनमूळ ऋण संख्या असते.
∛-a³ = - a
उदाहरणार्थ : ∛-8 = ∛-2³ = -2
3) सम संख्येचे घनमूळ सम संख्या असते.
उदा. ∛64 = 4
4) विषम संख्येचे घनमूळ विषम संख्या असते.
उदा. ∛27 = 3
5) दशांश अपूर्णांक संख्येचे घनमूळ :
संख्येत दशांश चिन्हाच्या नंतर x स्थळे असतील तर घनमूळ संख्येत दशांश चिन्हाच्या नंतर x/3 स्थळे असतात.
उदाहरणार्थ : ∛0.008 = 0.2
6) ∛(ab) = ∛a × ∛b
उदाहरणार्थ : ∛(16) = ∛(8×2) = ∛8 × ∛2
7) ∛(a/b) = ∛a / ∛b
उदाहरणार्थ : ∛(5/4) = ∛5 / ∛4
8) पूर्ण घन संख्येचे घनमूळ परिमेय संख्या असते.
उदाहरणार्थ : ∛1000 = 10
घन काढणे या क्रियेवर आधारित पुढे 10 गुणांची चाचणी दिलेली आहे. आपला घनमूळ काढणे या क्रियेचा अभ्यास तपासा. जो प्रश्न चुकेल त्या उदाहरणसंबंधी नियम समजून घ्या. घनमूळ काढण्याच्या नियमांचा अभ्यास करून आपले घनमूळ काढण्याचे कौशल्य सराव करून विकसित करा .
घनमूळ या क्रियेचा अभ्यास करण्यासाठी Google वर Ganit Expert Hovuya लिहून घन व घनमूळ सर्च करा.
जसे Ganit Expert Hovuya- घन व घनमूळ
आपला घनमूळ या क्रियेचा अभ्यास आहे का हे तपासण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. लिंक वर क्लिक करा. त्यामध्ये उदाहरणे दिलेली आहेत.
उदाहरणे सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करावा.
1) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.
3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit होईल .
4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे .
4) त्यानंतर आपले किती प्रश्न (question ) बरोबर सोडवले आहेत ते समजेल व चुकलेल्या प्रश्नाच्या ( questions ) उत्तराचे स्पष्टीकरण (explanation) Feedback मध्ये आपल्याला सादर होईल.
5) उदाहरणाचे उत्तर कोणता पर्याय येईल त्या पर्यायावर click करावे .
पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा questions स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
खालील लिंक वर क्लिक करा.
👇
चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी ) एंटर करा.

Post a Comment