दोन संख्यांपासून उदाहरणे
गणित विषयाचा पाया चांगला होण्यासाठी गणितातील क्रिया अचूक येणे आवश्यक आहे. स्वयं अध्ययनासाठी पुढीलप्रमाणे उदाहरणे तयार करा.
कोणत्याही दोन संख्या घ्या. गणितातील क्रियांवर आधारित उदाहरणे तयार करा.क्रिया - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, गुणाकार व्यस्त,.........
दोन संख्यांपासून उदाहरणे तयार करणे व सोडविणे
उदा. 16 व 9
1) 16 व 9 ची बेरीज करा.
16 + 9 = 25
2) 16 व 9 ची वजाबाकी करा.
16 - 9 = 7
3) 9 व 16 ची वजाबाकी करा.
9 - 16 = - 7
4) 16 व 9 चा गुणाकार करा.
16 × 9 = 144
5) 16 व 9 चा भागाकार करा.
16 ÷ 9 = 1.777...
6) 9 ÷ 16 करा.
9 ÷ 16 = 0. 5625
7) 16 व 9 या संख्यांच्या बेरजेचा वर्ग किती?
(16+9)² = 25² = 625
8) 16 व 9 या संख्यांच्या वजाबाकीचा वर्ग किती?
(16 -9)² = 7² = 49
9) 16 व 9 च्या बेरजेचे वर्गमूळ किती?
√ (16+9) = √25 = 5
10) 16 व 9 च्या वजाबाकीचे वर्गमूळ किती?
√ (16-9) = √7
11) 16 व 9 या संख्यांचे वर्ग लिहा
16 चा वर्ग = 256
9 चा वर्ग = 81
12) 16 व 9 या संख्यांच्या वर्गांची बेरीज किती ?
16² + 9² = 256 + 81 = 337
13) 16 व 9 या संख्यांच्या वर्गांची वजाबाकी किती ?
16² - 9² = 256 - 81 = 175
14) 16 व 9 या संख्यांची वर्गमूळे लिहा.
√16 = 4
√9 = 3
15) 16 व 9 या संख्यांची वर्गमूळांची बेरीज करा.
√16 + √9 = 4 + 3 = 7
16) 16 व 9 या संख्यांची वर्गमूळांची वजाबाकी करा.
√16 - √9 = 4 - 3 = 1
17) 16 व 9 या संख्यांची वर्गमूळांचा गुणाकार करा.
√16 × √9 = 4 × 3 = 12
18) 16 व 9 या संख्यांची वर्गमूळांचा भागाकार करा.
√16 ÷ √9 = 4 ÷ 3 = 4/3
19) 16 व 9 या संख्यांचे घन लिहा
16 चा घन = 16³ = 4096
9 चा घन = 9³ = 729
20) 16 व 9 या संख्यांचे गुणाकार व्यस्त लिहा ?
16 चा गुणाकार व्यस्त = 1/16
9 चा गुणाकार व्यस्त = 1/9
21 ) 16 व 9 या संख्यांच्या गुणाकार व्यस्तांकांची बेरीज करा.
16 चा गुणाकार व्यस्त = 1/16
9 चा गुणाकार व्यस्त = 1/9
1/16 + 1/9 = (9+16)/ 144
= 25/144
22) 16 व 9 या संख्यांच्या गुणाकार व्यस्तांकांची वजाबाकी करा.
16 चा गुणाकार व्यस्त = 1/16
9 चा गुणाकार व्यस्त = 1/9
1/16 - 1/9 = (9 -16)/ 144
= -7/144
16 चा गुणाकार व्यस्त = 1/16
9 चा गुणाकार व्यस्त = 1/9
1/16 × 1/9 = 1/144
24) 16 व 9 या संख्यांच्या गुणाकार व्यस्तांकांचा भागाकार करा.
16 चा गुणाकार व्यस्त = 1/16
9 चा गुणाकार व्यस्त = 1/9
1/16 ÷ 1/9 = 1/16 × 9/1
= 9 /16
25) 16 व 9 या संख्यांच्या विरुद्ध संख्या (बेरीज व्यस्त ) संख्या लिहा.
16 ची विरुद्ध संख्या = - 16
9 ची विरुद्ध संख्या = - 9
26) 16 व 9 या संख्यांच्या विरुद्ध संख्यांची बेरीज किती?
16 ची विरुद्ध संख्या = - 16
9 ची विरुद्ध संख्या = - 9
(-16) + (-9) = - 25
27) 16 व 9 या संख्यांच्या विरुद्ध संख्यांची वजाबाकी किती?
16 ची विरुद्ध संख्या = - 16
9 ची विरुद्ध संख्या = - 9
(-16) - (-9) = -16 + 9
= - 7
28) 16 व 9 या संख्यांच्या विरुद्ध संख्यांचा गुणाकार किती?
16 ची विरुद्ध संख्या = - 16
9 ची विरुद्ध संख्या = - 9
(-16) × (-9) = 144
29) 16 व 9 या संख्यांच्या विरुद्ध संख्यांचा भागाकार किती?
16 ची विरुद्ध संख्या = - 16
9 ची विरुद्ध संख्या = - 9
(-16) ÷ (-9) = 16/9
= 1.7777....
30) x व y ची बेरीज (16+9) आहे. समीकरण लिहा
x+y = 16+9
x+y = 25
31) 16 व 9 मधील लहानमोठेपणा चिन्हाने दाखवा.
16 > 9
32) 16 व 9 च्या विरुद्ध संख्यांमधील संबंध लहानमोठेपणा चिन्हाने दाखवा.
-16 < -9
33) 16 व 9 या संख्यांच्या गुणाकार व्यस्तांकांमधील संबंध लहानमोठेपणा चिन्हाने दाखवा.
1/16 व 1/9
1/16 < 1/9
34) 16 व 9 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत?
उत्तरे अनेक असू शकतील.
16 व 9 या पूर्णवर्ग प्रकारच्या संख्या आहेत.
35) 16 व 9 चा शेकडा 50 किती?
16 चा शेकडा 50 = 16 × 50/100
= 16 × 1/2
= 8
9 चा शेकडा 50 = 9 × 50/100
= 9 × 1/2
= 4.5
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Post a Comment