शिकण्याची भूख बाळगा,काही तरी करून दाखवायला वेड्या सारखं धडपडा.
नफा व तोटा
( Profit and Loss)
खरेदी किंमत : वस्तू ज्या किंमतीस घेतो ती किंमत म्हणजे खरेदी किंमत.
विक्री किंमत : वस्तू ज्या किंमतीस विकली जाते ती किंमत म्हणजे विक्री किंमत.
नफा ( Profit ) = विक्री किंमत - खरेदी किंमत
तोटा ( Loss) = खरेदी किंमत - विक्री किंमत
शेकडा नफा व तोटा काढणे :
शेकडा नफा व तोटा हा खरेदी किंमतीवर काढतात.
शेकडा नफा म्हणजे प्रति 100 ला मिळणारा नफा.
शेकडा नफा / 100 = नफा / खरेदी किंमत
शेकडा नफा = ( नफा / खरेदी किंमत ) × 100
शेकडा नफा = 100 × नफा / खरेदी किंमत
शेकडा नफा = 100 P / C
शेकडा तोटा म्हणजे प्रति 100 ला होणारा तोटा.
शेकडा तोटा / 100 = तोटा / खरेदी किंमत
शेकडा तोटा = ( तोटा / खरेदी किंमत ) × 100
शेकडा तोटा = 100 × तोटा / खरेदी किंमत
शेकडा तोटा = 100 L / C
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] रोहितने 5 लाख रुपयास घेतलेली गाडी शे.6 नफ्याने विकली, तर रोहितला किती रुपये मिळतील? (2020)
1) 5,20,000 रु. 2) 5,10,000 रु.
3) 6,00,000 रु. 4) 5,30,000 रु.
उत्तर : (4)
नफा = खरेदीच्या 6 %
नफा = 500,000 × 6 / 100
नफा = 5000 × 6
नफा = 30,000 रु.
विकून मिळणारी रक्कम = खरेदी किंमत + नफा
विकून मिळणारी रक्कम = 500,000 + 30,000
विकून मिळणारी रक्कम = 5,30,000 रु.
2] चंद्रपालने 9 लाख रुपयास खरेदी केलेला एक भूखंड शेकडा 15 नफ्याने विकला, तर त्याला किती रुपये मिळतील? (2017)
1) रु.10,25,000 2) रु.10,20,000
3) रु.10,35,000 4) रु.10,45,000
उत्तर : (3)
शेकडा नफा = 100 × नफा / खरेदी किंमत
15 = 100 × नफा / 9,00,000
15 × 9,00,000 = 100 × नफा
15 × 9,00,000 / 100 = नफा
15 × 9,000 = नफा
1,35,000 = नफा
विकून मिळणारी रक्कम = खरेदी किंमत + नफा
विकून मिळणारी रक्कम = 9,00,000 + 1,35,000
विकून मिळणारी रक्कम = 10,35,000 रु.
3] एका फळविक्रेत्याने न रु. 48 डझन या दराने 48 डझन संत्री विकत घेतली. त्यातील एक डझन संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री 6 रुपयास एक या प्रमाणे विकली.तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला? (2018)
1) रु.1128 2) रु.1220
3) रु.1080 4) रु.1440
उत्तर : (3)
एकूण खरेदी किंमत = 48 × 48
= 2304 रु.
उरलेली संत्री = 47 डझन
उरलेली सर्व संत्री 6 रुपयास एक या प्रमाणे विकली
संत्र्यांचा प्रति डझन विक्री दर = 12 × 6 = 72 रु.
एकूण विक्री किंमत = 47 × 72
= 3384 रु.
नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत
नफा = 3384 - 2304
नफा = 1080 रु.
4] एका दुकानदाराने रु.200 डझन या दराने 50 डझन वह्या विकत घेतल्या. त्या सर्व वह्या रु.225 डझन दराने विकल्या, तर त्याला शेकडा नफा किती झाला? (2017)
1) 10.5% 2) 11.5%
3) 12.5% 4) 14.5%
उत्तर : (3)
एकूण खरेदी किंमत = 50 × 200
= 10000 रु.
एकूण विक्री किंमत = 50 × 225
= 11250 रु.
नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत
नफा = 11250 - 10000
नफा = 1250 रु.
शेकडा नफा = 100 × नफा / खरेदी किंमत
शेकडा नफा = 100 × 1250 / 10000
शेकडा नफा = 125000 / 10000
5] विकासने एक घड्याळ रु 6540 व दुसरे घड्याळ रु 3460 ला खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्याने रु.10,900 ना विकली, तर त्याला या व्यवहारात शे. नफा अथवा शे. तोटा किती झाला? (2019)
1) शे. 8 नफा 2) शे. 8 तोटा
1) शे. 9 तोटा 4) शे. 9 नफा
उत्तर : (4)
एकूण खरेदी किंमत = 6540 + 3460
= 10,000 रु.
एकूण विक्री किंमत = 10,900 रु.
नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत
नफा = 10,900 - 10,000
नफा = 900 रु
शेकडा नफा = 100 × नफा / खरेदी किंमत
शेकडा नफा = 100 × 900 / 10,000
शेकडा नफा = 90000 / 10,000
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद
तुमची टिप्पणी एंटर करा.नंतर प्रकाशित करा.
👇
Post a Comment