Translate

Wednesday, July 2, 2025

NMMS - परीक्षेसाठी परिमेय संख्यांचे सखोल ज्ञान




🟢 परिमेय संख्या – Rational Numbers

           संकल्पना, उदाहरणे आणि उपयोग


 प्रस्तावना :

         गणितातील सर्वात महत्वाच्या संकल्पनांमध्ये परिमेय संख्या हे स्थान वेगळे आहे. या संख्यांमुळे आपल्याला अपूर्णांक, दशांश व भिन्न स्वरूपातील संख्यांची अचूक मोजणी करता येते. चला या संकल्पनेला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया.

🔹 परिमेय संख्या म्हणजे काय?

  p व q हे पूर्णांक  घेऊन ( q≠0 ) तयार होणाऱ्या p/q स्वरूपातील संख्याना  परिमेय संख्या  म्हणतात.


परिमेय  संख्यांचा  संच  Q या  अक्षराने दर्शवितात. 

Q  = { p/q| p, q ∈ I आणि  q ≠ 0 }


परिमेय संख्या उदाहरणे :


 3/5,      6 =(6/1),     0,    1/3,   22/7, 

√0.16,    √(20/5)= √4 = 2     0.141414... 
 
  0.7̅,   1.6̅3


✅ साध्या शब्दांत – भिन्न रूपात व्यक्त करता येणारी प्रत्येक संख्या परिमेय संख्या असते.


   1)  प्रत्येक नैसर्गिक  संख्या  ही परिमेय  संख्या  असते. ती  p/q स्वरूपात  लिहितात  येते. 

उदाहरणार्थ :
 
  5 =  5/1, 

2) प्रत्येक पूर्ण   संख्या  ही परिमेय  संख्या  असते. ती  p/q स्वरूपात  लिहितात  येते. 

उदाहरणार्थ :
 
  0 =  0/1, 

लक्षात ठेवा – प्रत्येक पूर्णांकही परिमेय संख्या असतो कारण आपण त्याला छेद ठेवून भिन्न स्वरूपात लिहू शकतो.


3)  प्रत्येक पूर्णांक  संख्या  ही परिमेय  संख्या  असते. ती p/q स्वरूपात  लिहितात  येते. 

उदाहरणार्थ :
 
   -11 =  -11/1


4)  नैसर्गिक  संख्या, पूर्ण  संख्या व  पूर्णांक  संख्या  या  परिमेय  संख्या  आहेत. 

        N ⊆  W ⊆  I  ⊆ Q




🔹 परिमेय संख्यांचे महत्वाचे गुणधर्म :


1)   परिमेय संख्या अनंत आहेत.

2) कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात.


 3) परिमेय  संख्येचे  दशांशरूप :


परिमेय  संख्येच्या अंशाला छेदाने भागताना दशांश अपूर्णांकाचा  उपयोग केला तर त्या  संख्येचे दशांशरूप  मिळते. 


उदाहरणार्थ :  11/4 = 2.75 येथे 11 ला  4 ने भागल्यावर बाकी शून्य  येथे. भागाकाराची क्रिया  पूर्ण होते. 

परिमेय  संख्येच्या  अशा  दशांशरुपाला खंडित  दशांशरूप  म्हणतात. 

4)  प्रत्येक  परिमेय  संख्येचे  दशांशरूप  अखंड  आवर्ती  रूपात  लिहितात  येते. 


उदाहरणार्थ :

 

0.5 = 0.500000... = 0.50̅


12 = 12.00000000......=12.



 लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे :


🔸 शून्य देखील परिमेय संख्या आहे.

🔸 प्रत्येक पूर्णांक परिमेय असतो.

🔸 अपरिमेय संख्या परिमेय नसतात.


🔹 उपयोग व उदाहरणे


✅ शालेय गणित – प्रमाण व अपूर्णांकातील गणना

✅ वास्तव जीवनात – लांबी, वजन मोजणे

✅ विज्ञान व इंजिनियरिंग – मोजमापे अचूक दाखवणे


खालील  परिमेय  संख्या  दशांश  रूपात  लिहा. 

1)  20          2)  5/4          3)  3/4          

4)15/9         5) 1/3


उत्तरे :

 1) 20.0̅      2) 1.25    3) 0.75

 4)1.6̅           5) 0.333333 = 0.3⁻




🟢 परिमेय संख्यांवर आधारित MCQ प्रश्न (उत्तरांसह)


✦ प्रश्न 1

खालीलपैकी कोणती संख्या परिमेय (Rational) आहे?

A)  π
B)   7
C) √ 2
D) 1.5050050005......

उत्तर:
B)
(कारण भिन्न स्वरूपात लिहिता येते.)


✦ प्रश्न 2

खालीलपैकी कोणत्या संख्येला भिन्न रूपात लिहू शकता?

A) 0.33333....

B) π

C) √ 2

D) √ 7

उत्तर:
A)
(1/3, म्हणून परिमेय संख्या)


✦ प्रश्न 3

जर p आणि q  पूर्णांक असतील आणि q≠0 तर या p/q स्वरूपातील संख्या काय म्हणतात?

A) अपरिमेय संख्या
B) नैसर्गिक संख्या
C) पूर्णांक
D) परिमेय संख्या

उत्तर:
D) परिमेय संख्या


✦ प्रश्न 4

कोणती संख्या परिमेय नाही?

A) 22/7
B) π
C) 3.14
D) 0

उत्तर:
B)
(   π चे अंदाजे मूल्य आहे, जे अपरिमेय असते.)


✦ प्रश्न 5

सर्व पूर्णांक परिमेय असतात का?

A) हो
B) नाही

उत्तर:
A) हो
(कारण प्रत्येक पूर्णांकाला p/q या रूपात लिहिता येते.


•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••



🧠 तुमचं मत काय आहे?
कृपया खाली कॉमेंट करून सांगा की तुम्ही गणिताचा अभ्यास कसा करता!
✍️ आणि हा लेख उपयुक्त वाटला तर जरूर शेअर करा.


लेखक: Ganit Expert Hovuya 
📌 स्पर्धा परीक्षांसाठी गणित मार्गदर्शन





अजून अशाच उपयुक्त माहितीकरिता भेट द्या:

Ganit Expert Hovuya


https://ganitexperthovuya.blogspot.com














Post a Comment

0 Comments:

Post a Comment

0 Comments:

Post a Comment