मुलांच्या शिक्षणातील गुंतवणूक ही उत्तम व श्रेष्ठ गुंतवणूक
घातांक (Exponential)
आजचे युग हे स्पर्धेचे आहे. शालेय जीवनात प्रवेशापासूनच स्पर्धेची सुरूवात होते. स्पर्धा परीक्षेतील गणित (Maths) याविषयामुळे सर्वसामान्य मुलांमध्ये भिती निर्माण झालेली असते.NMMS, SCHOLARSHIP व इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग होईल अशी उदाहरणे देण्याचा हा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी या उदाहरणांचा अभ्यास केल्यास गणिताबद्दलची भिती जाईल. गणिताबद्दलची आवड निर्माण होईल .स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळेल याची खात्री वाटते.
घातांक |Exponent Indices |ghatank | हे प्रकरण अतिशय महत्वाचे आहे.प्रत्येक स्पर्धा परीक्षेत घातांक या घटकावर उदाहरणे असतात.घातांकाचे नियम (Laws of Indices) समजून घेणे,चांगला अभ्यास करणे गरजेचे आहे.घातांकाचे नियम व उदाहरणे पुढील लिंक वर पहा.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
1]खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे.
A) 1² B) 4° C ) 0⁴ D) 4
1) A व B ची किंमत असमान आहे.
2)A व B ची किंमत समान आहे.
3) B व C ची किंमत समान आहे.
4) A , B व C ची किंमत समान आहे.
उत्तर :(2)
A) 1²= 1 B) 4° = 1
C ) 0⁴= 0 D) 4
•••••••••••••••••••••••••••••••••
2] [ (4³)⅓]°= x तर x ची किंमत किती?
1) 4 2) 64 3) 0 4) 1
उत्तर: (4) नियम a°= 1
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
3] [(729)⅓ × (343)⅓]÷ 3² = y तर y ची किंमत किती?
1) 9 2) 49 3) 7 4) 14
उत्तर (3)
(729)⅓= 9 a¹/ ⁿ= a चे n वे मूळ
(343)⅓= 7
3²=9
उदाहरणात किमती ठेवू
(9×7)÷ 9 = y
63÷9= y
7 = y
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
4] (3°-4°)×5² ची किंमत किती?
1) 0 2)- 25 3) 10 4) 25
उत्तर :(1)
= (1-1)×25 a° = 1
= 0×25
= 0
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
5] (5)¼×(125)¼ ची किंमत किती?
1) √5 2)5√5 3) 25 4 ) 5
उत्तर :(4)
=(5)¼×(5 ×5 ×5)¼
=(5)¼×(5)¼×(5)¼×(5)¼
(ab)ᵐ=aᵐbᵐ
=(5)¼+¼+¼+¼ aᵐ×aⁿ=aᵐ⁺ⁿ
=5¹
=5
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
✍️ आणि हा लेख उपयुक्त वाटला तर जरूर शेअर करा.
लेखक: Ganit Expert Hovuya
श्री.जे.एम.पाटील
अधिक माहितीसाठी संपर्क:8329467192
📱 WhatsApp: 9405559874
📌 स्पर्धा परीक्षांसाठी गणित मार्गदर्शन
अजून अशाच उपयुक्त माहितीकरिता भेट द्या.GEH
खूपच छान सर .
Unknown | September 16, 2020 at 8:34 AMस
Unknown | September 20, 2020 at 4:21 PMVery good sir only problem of explanation only due to this situation
mak64 | September 21, 2020 at 4:44 PM