दैनंदिन जीवनातून गणित कसे शिकावे?
प्रस्तावना
गणित हा केवळ वर्गात शिकवला जाणारा विषय नसून तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपण खरेदी करताना, प्रवास करताना, वेळेचे नियोजन करताना, अगदी स्वयंपाक करतानाही गणिताचा वापर नकळत करत असतो. जर आपण या गोष्टींमध्ये लपलेले गणित समजून घेतले, तर गणित शिकणे अधिक सोपे व रोचक होईल.
दैनंदिन जीवनातील गणिताची काही उदाहरणे
-
बाजारात खरेदी करताना
- वस्तूंची किंमत, सवलत, परत मिळणारे उरलेले पैसे हे सगळे गणिताचे व्यवहार आहेत.
- उदा. “7 वस्तू ₹ 91 ला घेतल्या, तर एकाची किंमत किती?”
-
स्वयंपाक करताना
- कोणत्याही मिश्रणातील,संयुगातील घटक पदार्थांचे प्रमाण, वेळ, तापमान हे सर्व गणितावर आधारित असते.
- उदा. “4 लोकांसाठी २५० ग्रॅम तांदूळ लागतो, तर 10 लोकांसाठी किती किलोग्रॅम तांदूळ लागेल?”
-
प्रवास करताना
- अंतर, वेळ, वेग आणि खर्च याचा हिशोब करताना गणिताचा वापर होतो.
- उदा. “बसचा भाडा प्रति किमी ₹ 6 असेल, तर 21 किमी प्रवासासाठी किती पैसे द्यावे लागतील?”
- ताशी 50 किमी वेगाने 250 किमी अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल?
-
वेळेचे नियोजन करताना
- अभ्यास, खेळ, विश्रांती यासाठी वेळेचे योग्य विभाजन करा.वेळेचे गुणोत्तर काढा. या सर्व क्रियांसाठी गणित मदत करते.
-
खेळामध्ये गणित
- क्रिकेटमध्ये धावा, टक्केवारी, सरासरी, रनरेट तर कॅरम/चेसमध्ये गुणगणना – हे सर्व गणित आहे.
गणित शिकण्यासाठी दैनंदिन जीवनातील सोपे उपाय
- खरेदी करताना उरलेले पैसे स्वतः मोजा.
- घरातल्या छोट्या कामांत वेळ आणि प्रमाण याचा हिशोब काढा.
- मुलांसोबत गणिती खेळ खेळा (उदा. Sudoku, लूडो, पत्ते).
- कुठल्याही समस्येला गणिती रूप द्या (उदा. “जर मला १ तासात ५ पानं लिहिता आली, तर १५ पानं लिहायला किती वेळ लागेल?”).
निष्कर्ष
गणित म्हणजे केवळ पुस्तकांतील कठीण सूत्रे नाहीत, तर आपल्या जगण्याचा पाया आहे. दैनंदिन जीवनात आपण जेव्हा गणिताशी जोडलेले अनुभव घेऊ लागतो, तेव्हा गणित शिकणे केवळ सोपेच नाही तर आनंददायी देखील होते.
✍️ आणि हा लेख उपयुक्त वाटला तर जरूर शेअर करा.
लेखक: Ganit Expert Hovuya
श्री.जे.एम.पाटील
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:8329467192
📱 WhatsApp: 9405559874
📌 स्पर्धा परीक्षांसाठी गणित मार्गदर्शन
अजून अशाच उपयुक्त माहितीकरिता भेट द्या
https://ganitexperthovuya.blogspot.com


Post a Comment