Translate

Thursday, October 21, 2021

गणित शिकूया -31- दोन घनांच्या वजाबाकीचे अवयव - Factors of Substraction of two Cubes

  



दोन घनांच्या वजाबाकीचे अवयव (Factors the Substraction of two Cubes)


 Don               दोन घनांच्या वजाबाकीचे अवयव |Factors the Substraction of two Cubes| don ghnanchya vajabakiche avyv |factors of a³-b³|या बद्दल माहिती घेऊ.


दोन घनांच्या वजाबाकीचे अवयव सूत्र 

  ↓-------विरुद्ध चिन्ह--

a³-b³  =  (a-b) (a²+ab+b²)

  समान चिन्ह

 (पहिले पद)³ - (दुसरे पद)³ = (पहिले पद - दुसरे पद )  ( पहिले पद² + पहिले पद × दुसरे पद + दुसरे पद²)


लक्षात ठेवा :

1) दिलेली बैजिक राशी दोन घनांच्या वजाबाकी च्या स्वरूपात लिहिणे. a³ - b³

उदा. 8x³- 27 = (2x)³ - 3³ अशी लिहिणे.


2)  दोन घनांच्या वजाबाकीचे अवयव दोन असतात.

       (a - b) (a² + ab + b²)

3)  पहिला अवयव हा द्विपदी असून घनमुळांची वजाबाकी असते.

     (a - b) 

4)  दुसरा अवयव हा त्रिपदी असून घनमुळांच्या वर्गांची बेरीज व घनमुळांचा गुणाकार यांची बेरीज असते.

 (a² + b²+ ab) = (a² + ab + b²) 




उदाहरणे :

1) m³ - 64

 = m³ - 4³.........दोन घनांच्या वजाबाकीच्या स्वरूपात

=  (m - 4) (m² + m × 4  + 4²)


=  (m - 4) (m² +  4m + 16)


2) 125p³ - 27q³ 

(5p)³ - (3q)³.........दोन घनांच्या वजाबाकी च्या स्वरूपात

  •   (5p - 3q) [(5p)² + 5p × 3q  + (3q)²)


=  (5p - 3q) (25p² +  15pq + 9q²)


125p³ - 27q³ 

(5p)³ - (3q)³.........दोन घनांच्या वजाबाकी च्या स्वरूपात

  •   (5p - 3q) [(5p)² + 5p × 3q  + (3q)²)


=  (5p - 3q) (25p² +  15pq + 9q²)


3)  16p³ - 128q³ 

 = 2(8p³ -64q³)

=   2[(2p)³ - (4q)³].........दोन घनांच्या वजाबाकीच्या स्वरूपात 

  • = 2 [(2p - 4q) [(2p)² + 2p × 4q  + (4q)²)


=  2 (2p - 4q) (4p² + 8pq + 16q²)




दोन घनांच्या वजाबाकीचे अवयव यावरील उदाहरणे सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करावा.

1) पुढे दिलेल्या लिंक वर(Test/चाचणी) क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .

2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.

3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit  होईल .

4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे . 

5) त्यानंतर आपले किती  प्रश्न  (question ) बरोबर सोडवले आहेत  ते समजेल व  चुकलेल्या प्रश्नाच्या  ( questions )  उत्तराचे  स्पष्टीकरण (explanation)  Feedback मध्ये  आपल्याला सादर होईल. 

6) उदाहरणाचे उत्तर कोणता पर्य

पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा questions स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .

खालील लिंक वर क्लिक करा.

👇

                

               https://forms.gle/pxMTRCHSYxGEDRb47

                      

                       

                              👇


चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी ) एंटर  करा व प्रकाशित करा 



गणिताच्या अधिक अभ्यासासाठी पुढील वेबसाईटला टच करा .


https://ganitexperthovuya.blogspot.com

Post a Comment

0 Comments:

Post a Comment

0 Comments:

Post a Comment