Translate

Sunday, October 3, 2021

गणित शिकूया -28- गट करून बैजिक राशींचे अवयव पाडणे-Factorising an algebraic expression by groupping terms

 



गट करून बैजिक राशींचे अवयव (Factorising an algebraic expression by grouping the terms)


                                                                 सामाईक अवयवसाधारणअवयव|Common Factor|Samayavyv|Factorising an algebraic expression by grouping the terms|  हा एक    गणितातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. ल.सा.वि.(L.C.M.), म.सा.वि.(G.C.D/ H.C.F.),काढणे,वर्ग त्रिपदीचे अवयव पाडणे,(Factors of quadratic trinomial),वर्ग समीकरणे सोडविणे,इत्यादी प्रकारची उदाहरणे सोडविताना सामाईक अवयव पाडणे ही क्रिया करावी लागते.सामाईक अवयव पाडणे ही कृती चुकल्यास आपले उदाहरण चुकते.म्हणून समाईक अवयव या संकल्पनेचा चांगला अभ्यास करूया.


• दोन किंवा अधिक संख्यांमध्ये महत्तम सामाईक अवयव काढणे म्हणजे म.सा.वि.काढणे.

क्लिक करा 👇


      म.सा.वि.बद्दल अधिक माहिती पहा.



गट करून सामाईक अवयव काढणे (Factorising an algebraic expression by grouping the terms )

1)ma+mb+na+nb चार पदात सामाईक अवयव नाही.

2)ज्या दोन पदांमध्ये सामाईक अवयव आहे,अशा दोन दोन पदांचे गट तयार करा .

ma+mb ,na+nb

3 ) प्रत्येक गटातून सामाईक अवयव काढा.

m(a+b)+ n(a+b)

4) दोन्ही पदांमध्ये सामाईक असलेला कंस (सामायिक अवयव ) प्रथम लिहा. उरलेली पदे दुसऱ्या कंसात चिन्हासह लिहा.

(a+b)(m+n)  


ma+mb+na+nb

=m(a+b)+ n(a+b)

(a+b(m+n)       .........(a+b) हा सामाईक कंस प्रथम लिहून ,इतर पदे दुसऱ्या कंसात लिहा.

उदाहरणे :

1) ab + cd + ac + bd

ab + ac +  bd + cd

= a (b+c) + d  (b+c)

=  (b+c) (a+d)


3) 2x² + 4x³ + 2x + 1

 4x³ + 2x²  + 2x + 1

= 2x² (2x+1) + 1 (2x+1)

= (2x+1) (2x²+1)

3) ma + mb + mc na + nb +nc

= m (a + b + c) + n (a + b + c )

= (a + b + c) ( m + n )



उदाहरणे सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करावा.

1) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .

2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.

3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit  होईल .

4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे . 

5) त्यानंतर आपले किती  प्रश्न  (question ) बरोबर सोडवले आहेत  ते समजेल व  चुकलेल्या प्रश्नाच्या  ( questions )  उत्तराचे  स्पष्टीकरण (explanation)  Feedback मध्ये  आपल्याला सादर होईल. 

6) उदाहरणाचे उत्तर कोणता पर्याय

पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा questions स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .

खालील लिंक वर क्लिक करा.

👇

                 https://forms.gle/9Z6FjaqfGpJgLhZm7

               

                      https://ganitexperthovuya.blogspot.com


                       👇

 


चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी ) एंटर  करा व प्रकाशित करा 


👇




 


Post a Comment

1 Comments:

Pruthviraj katkar

Anonymous | August 27, 2023 at 1:45 PM

Post a Comment

1 comment: