सामाईक अवयव (Common Factor
सामाईक अवयव - साधारण अवयव |Common Factor|Samayik avyv|हा एक गणितातील अत्यंत महत्वाचा भाग आहे.ल.सा.वि.(L.C.M.), म.सा.वि.(G.C.D/ H.C.F.),काढणे,वर्ग त्रिपदीचे अवयव पाडणे,(Factors of quadratic trinomial),वर्ग समीकरणे सोडविणे,इत्यादी प्रकारची उदाहरणे सोडविताना सामाईक अवयव पाडणे ही क्रिया करावी लागते.सामाईक अवयव पाडणे ही कृती चुकल्यास आपले उदाहरण चुकते.म्हणून समाईक अवयव या संकल्पनेचा चांगला अभ्यास करूया.
अवयव : दिलेली संख्या किंवा बैजिक राशी गुणाकाराच्या रूपात व्यक्त करणे.
उदा. 26 = 2 × 13 2 व 13 हे अवयव आहेत.
7x = 7 × x 7 व x हे अवयव आहेत.
सामाईक अवयव शोधण्याच्या पद्धती :
1] संख्यांमधील सामाईक अवयव :
• सामाईक अवयव म्हणजे समान अवयव.
• 1 हा प्रत्येक संख्येचा समान अवयव असतो.
उदा. 7 व 9 यांचा सामाईक अवयव
7 = 1 × 7
9 = 1 × 9
7 व 9 मध्ये 1 हा सामाईक अवयव आहे.
7+9 = 1×7 + 1×9 = 1(7+9)
• दोन किंवा अधिक संख्यांमध्ये महत्तम सामाईक अवयव काढणे म्हणजे म.सा.वि.काढणे.
क्लिक करा 👇
म.सा.वि.बद्दल अधिक माहिती पहा.
म.सा.वि : दिलेल्या संख्यांचा किंवा बैजिक राशींचा म.सा.वि.काढणे म्हणजे मोठ्यात मोठा विभाजक (निःशेष भाग जाणारा भाजक) शोधणे.
उदा. 15 व 20 चा मसावि 5आहे.म्हणजेच 5 हा सामाईक अवयव आहे.
15+20= 3 × 5 + 4×5 =5(3+4)
• सामाईक अवयव काढताना मोठ्यात मोठा सामाईक अवयव (म.सा.वि.) कंसाच्या बाहेर काढला जातो.
• सामाईक अवयवाने प्रत्येक संख्येला भागा व येणारा भागाकार चिन्हासह लिहा.
उदा. 1) 8 + 28
= 2 × 4 + 4 × 7
= 4 (2 + 7).........4हा सामाईक अवयव
सामाईक अवयव काढणे महत्वाची सूत्रे :
द्विपदीचे अवयव :
1] ax + ay = a × x + a × y
ax + ay = a (x + y) a हा सामाईक अवयव
उदा. 1) 2x + 10y = 2(x +5y)
2) 6a - 15b = 3 (2a - 5b)
3) 20 x²y + 30xy²= 10xy (2x +3y)
2] - a -b = - 1( a+ b)
कंसाच्या बाहेर ऋण पद सामाईक काढले तर कंसामध्ये प्रत्येक पदाचे चिन्ह बदलते.
उदा. 1) -3 + 24
= - 3 × 1 + 3 × 8
= -3 (1 - 8) .......-3 हा सामाईक अवयव
उदाहरणे सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करावा.
1) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.
3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit होईल .
4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे .
5) त्यानंतर आपले किती प्रश्न (question ) बरोबर सोडवले आहेत ते समजेल व चुकलेल्या प्रश्नाच्या ( questions ) उत्तराचे स्पष्टीकरण (explanation) Feedback मध्ये आपल्याला सादर होईल.
6) उदाहरणाचे उत्तर कोणता पर्याय आहे,हे अचूक शोधा.व पर्यायावर क्लिक करा.
पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा questions स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
खालील लिंक वर क्लिक करा.
👇
https://forms.gle/Vm6rVvZp4J87nTP4A
👇
https://ganitexperthovuya.blogspot.com
चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी ) एंटर करा व प्रकाशित करा

Post a Comment