विस्तार सूत्रांवर आधारित उदाहरणे
Examples Based on Expansion formulae
विस्तार सूत्रे |Expansion Formulae| हा घटक खूप महत्वाचा आहे. विस्तार सूत्रांचा उपयोग बैजिक राशींचा विस्तार,वर्ग करणे,घन करणे, चौरस व आयत यांचे क्षेत्रफळ काढणे, घनाकृतीचे घनफळ काढणे.इत्यादी उदाहरणे सोडविण्यासाठी करता येतो.NMMS परीक्षेत विस्तार सूत्रांवर प्रश्न असतोच.विस्तार सूत्राचे उपयोजन करता येणे आवश्यक आहे.पुढील सूत्रे अभ्यासा व त्यांवरील ऑनलाईन चाचणी सोडवा.
विस्तार सूत्रे : Expansion Formulae
1) ( a + b )² = a² + 2ab + b²
2) ( a - b )² = a² - 2ab + b²
3) ( a + b ) ( a - b ) = a² - b²
4) (x+a) (x+b) = x² + (a+ b) x + a b
5) (a+b+c)² = ( a²+b²+c²+2ab+2bc
+2ca)
6) (a+b)³ = a³ + 3a²b + 3ab² + b³
7) (a - b)³ = a³ - 3a²b + 3ab² - b³
वरील सर्व सूत्रांवर आधारित पुढे 15 गुणांची चाचणी दिलेली आहे. आपला विस्तार करणे या क्रियेचा अभ्यास नीट आहे का तपासा. जो प्रश्न चुकेल त्या उदाहरणासंबंधी सूत्र समजून घ्या. सूत्रातील पदांची चिन्हे समजून घ्या.उदाहरणा- तील पदांवरून कोणते सूत्र वापरायचे हे अचूक निश्चित करा.सूत्रातील कोणकोणत्या पदांच्या किंमती दिलेल्या आहेत हे लक्षात घेऊन किंमती ठेवा.ज्या पदांची किंमत काढावयाची आहे त्या पदांची किंमत काढा.
उदाहरणे सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करावा.
1) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.
3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit होईल .
4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे .
5) त्यानंतर आपले किती प्रश्न (question ) बरोबर सोडवले आहेत ते समजेल व चुकलेल्या प्रश्नाच्या ( questions ) उत्तराचे स्पष्टीकरण (explanation) Feedback मध्ये आपल्याला सादर होईल.
6) उदाहरणाचे उत्तर कोणता पर्याय येईल त्या पर्यायावर click करावे .
पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा questions स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
खालील लिंक वर क्लिक करा.
👇
👇
चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी ) एंटर करा व प्रकाशित करा

Post a Comment