गती महत्वाची नाही. दिशा महत्वाची, तुमचे ध्येय स्पष्ट हवे.
अध्ययन घटक : अपरिमेय संख्या व वास्तव संख्या
अपरिमेय संख्या (Irrational Numbers )
ज्या संख्यांची दशांश मांडणी अखंड व अनावर्ती असते, अशा संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात.
उदाहरणार्थ :
√3 = 1.73205080...., √5 = 2.236...,
अपरिमेय संख्या:
√2 , √3, √5, √6, √7, 0.101001000..., π.
अपरिमेय संख्यांचा संच Q' या अक्षराने दर्शवितात.
Q' = सर्व अपरिमेय संख्या.
वास्तव संख्या :
सर्व परिमेय संख्या व अपरिमेय संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्यांना वास्तव संख्या म्हणतात.
वास्तव संख्यांचा संच R या अक्षराने दर्शवितात.
R = { x| x ∈ Q किंवा x ∈ Q'}
R = Q ∪ Q'
N ⊆ W ⊆ I ⊆ Q ⊆ R आणि Q'⊆ R
वास्तव संख्या
वास्तव संख्या (R) - समूहामध्ये खालील संख्या समूहांचा समावेश होतो
A) परिमेय संख्या (Q) B)अपरिमेय संख्या(Q')
A) परिमेय संख्या (Q) -समूहामध्ये
पुढील संख्या समूह आहेत.
a) पूर्णांक संख्या (I) b) अपूर्णांक (धन व ऋण )
पूर्णांक संख्या (I) -समूहामध्ये पुढील संख्या आहेत.
1) पूर्ण संख्या (W) : शून्य व धन पूर्णांक
2) ऋण पूर्णांक
पूर्ण संख्या (W) समूहामध्ये पुढील संख्या येतात.
शून्य व धन पूर्णांक (नैसर्गिक संख्या N)
स्वाध्याय : (1)
खालील संख्यांपैकी परिमेय संख्या व अपरिमेय संख्या ओळखा.
1) 0 2) √7 3)√(9)/2 4)4.5555... 5)√(11/2) 6) π. 7) 22/7 8) 1.2032003..., 9) √0.225 10) √(8/2)
स्वाध्याय : (2)
पुढील विधाने सत्य किंवा असत्य आहेत ते लिहा.
1) 0(शून्य ) ही अपरिमेय संख्या नाही.
2) -2 ही अपरिमेय संख्या आहे.
3) सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या आहेत.
4) अपरिमेय संख्यांची दशांश मांडणी अखंड व अनावर्ती असते.
5) √7 ही वास्तव संख्या नाही.
उत्तरे :
स्वाध्याय : (1)
परिमेय संख्या : (1), (3), (4), (7), (9), (10).
अपरिमेय संख्या: (2), (5), (6), (8).
स्वाध्याय : (2)
सत्य विधाने : (1), (3), (4)
असत्य विधाने : (2), (5)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


उत्तम
जयसिंग पाटील | June 21, 2021 at 3:39 PMDarshan
Anonymous | July 18, 2023 at 8:15 AM