ऋण घातांक असलेले घात
ऋण घातांक |Negative power-run ghatank|असेल तर संख्येची किंमत काढता येते.
संख्येचा घातांक|Exponent - ghatank| हा धन,ऋण किंवा शून्य असू शकतो.धन घातांकअसताना गुणाकार केला जातो.तर ऋण घातांक असताना भागाकार केला जातो.10⁻² या संख्येत घातांक ऋण पूर्णांक परंतु10⁻² आहे म्हणजे किती?असा प्रश्न पडतो. म्हणून उदाहरणाचे उत्तर ऋण घातांकात लिहीत नाहीत.घातांकांचे नियमाचे उपयोजन करून10⁻² ही संख्या1/10² अशी लिहिता येते.धन घातांकाचे ऋण घातांकात किंवा ऋण घातांकाचे धन घातांकात रूपांतर करण्यासंबंधी घातांकाचा महत्तवाचा नियम पुढील आहे.
ऋण घातांकाचे धन घातांकात रूपांतर करण्यासंबंधी
a ह्या कोणत्याही शून्येतर पूर्णांकासाठी
a⁻ᵐ = 1/aᵐ
( a⁻ᵐ हा aᵐ चा गुणाकार व्यस्त आहे.)
धन घातांकाचे ऋण घातांकात रूपांतर करण्यासंबंधी
aᵐ = 1/ a⁻ᵐ
परीक्षेसाठी उदाहरणे :
1 ] 0.5 ही संख्या.............. अशी लिहिता येईल.
1) 5×10² 2) 5×10⁻² 3) 5×0.01 4) 5×10⁻¹
उत्तर : (4)
0.5
=5/10
=5/10¹
=5×10⁻¹ ( 1/aᵐ = a⁻ᵐ )
2] 0.003 ही संख्या घातांक रूपात खालील प्रमाणे लिहितात ?
1) 3×10⁻² 2) 3×10⁻⁴ 3) 3×10⁻³ 4) 3× 0.100
उत्तर :(3)
0.003
=3/1000
=3 /10³
=3×10⁻³ (1/aᵐ = a⁻ᵐ )
3] 4⁻¹ - 2⁻³ = किती ?
1)1/8 2)1/16 3) 1/4 4)1/32
उत्तर : (1)
4⁻¹ - 2⁻³
= 1/4¹ - 1/2³ ( a⁻ᵐ = 1/aᵐ )
= 1/4 -1/8
= ( 8 -4)/ 32
= 4/32
= 1/8
4] जर x = 2⁻¹ आणि y = 2⁻² तर x+y = किती ?
1)3/4 2)5/4 3)1/4 4) 1/2
उत्तर : (1)
x = 2⁻¹
x = 1/2¹ ( a⁻ᵐ= 1/aᵐ )
x = 1/2
y = 2⁻²
y = 1/ 2² ( a⁻ᵐ= 1/aᵐ )
y= 1/4
x+y =1/2+1/4
x+y= (4+2)/8
x+y=6/8
x+y=3/4
5] 3ᵐ + 3ᵐ⁺¹ = 108असेल तर ᵐ = किती?
1) 9 2) 3 3)27 4) 1/3
उत्तर :(2)
3ᵐ + 3ᵐ⁺¹ = 108
3ᵐ + 3ᵐ × 3¹ = 108 (aᵐ⁺ⁿ =aᵐ× aⁿ)
3ᵐ( 1+3 ) = 108
3ᵐ (4) = 108
3ᵐ =108/4
3ᵐ = 27
3ᵐ = 3³
ᵐ = ³
(जर a ˣ = aʸ तर ˣ=ʸ )
****************************************
धन्यवाद



Great experience
Unknown | September 13, 2020 at 12:20 PMउत्तम
जयसिंग पाटील | July 16, 2021 at 9:48 AMThanks
Ganit Expert Hovuya -स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन | July 22, 2023 at 10:53 PMThanks
Ganit Expert Hovuya -स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन | July 22, 2023 at 10:53 PM