शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम व्याज मिळवून देते.
बहुपदी (polynomial )
1) बैजिक राशी (Algebraic Expression) :
संख्या आणि चल यांचे +, -, ×, ÷ या चिन्हांनी जोडून तयार झालेली राशी.
उदा. 5x- y, x-2
2) बहुपदी (polynomial ) :
एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा पूर्ण संख्या (0,1,2,3,......) असेल, तर ती राशी एका चलातील बहुपदी असते.
बहुपदीमध्ये प्रत्येक चलाचा घातांक ऋणेतर पूर्णांक ( शून्य किंवा धन ) असतो.
उदाहरणार्थ : x²+2x+3 ; 3y³ +5y²+ y+7
3) बहुपदीची कोटी : (Degree of a polynomial):
दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात.
x²+3 या बहुपदीची कोटी 2आहे.
y+5 या बहुपदीची कोटी 1आहे.
कोणत्याही शून्येतर स्थिरपदाची कोटी शून्य असते.
उदाहरणार्थ : 7 ची कोटी शून्य असते कारण
7 = 7×x⁰
4) एकापेक्षा अधिक चलातील बहुपदीची कोटी :
बहुपदीतील प्रत्येक पदामध्ये असलेल्या चलांच्या घातांकांची सर्वात मोठी बेरीज.
उदा. x²y² + 3xy² ची कोटी
x²y² या पदातील चलांच्या घातांकांची बेरीज = 2 + 2 = 4
3xy² या पदातील चलांच्या घातांकांची बेरीज = 1 + 2 = 3
x²y² + 3xy² ची कोटी = 4
5) बहुपदीचे प्रमाणरूप (Standard Form ) :
बहुपदीचे प्रमाणरूप म्हणजे बहुपदीतील पदे चलांच्या घातांकांच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिणे.
उदा. चलांच्या घातांकांच्या उतरत्या क्रमाने लिहिणे.
x³ + 7x² + 6x - 8
उदा. चलांच्या घातांकांच्या चढत्या क्रमाने लिहिणे.
- 8 +6x +7x² + x³
6) बहुपदीत येणाऱ्या अक्षराला चल म्हणतात. चलापूर्वी (सोबत )असणाऱ्या संख्येला सहगुणक म्हणतात.
चलासोबत सहगुणक लहिलेला नसेल तर सहगुणक 1 असतो.
उदा. 3x² - x
x² चा सहगुणक 3 तर x चा सहगुणक -1 आहे.
7) एकपदी : राशीत एकच पद असते.
उदा. 5mn
द्विपदी : राशीत दोन पदे असतात.
उदा. 5mn + 19
त्रिपदी : राशीत तीन पदे असतात.
उदा. a² + 11a- 7
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] 51 या बहुपदीची कोटी किती?
1) 2 3) 1 3) 5 4) 0
उत्तर : (4)
कोणत्याही शून्येतर स्थिरपदाची कोटी शून्य असते.
51 ची कोटी शून्य असते कारण
51 = 7 × x⁰
2] जर a = m, b = m - 4, c = m+2, तर 4a+3b-7c = किती? (2018)
1) 26 2) 14 3) -26 4)-14
उत्तर :(3)
4a+3b-7c
= 4(m) + 3(m-4) -7 (m+2)
= 4m + 3m - 12 - 7m - 14
= 4m + 3m - 7m -12 - 14
= 7m - 7m - 12 - 14
= - 26
3] पुढीलपैकी कोणती राशी बहुपदी नाही. (2017)
1) x² - 3/x + 7 2) 5x² - 10x - 5
3) - 10/3 x³ - 5x 4) √3 x⁵ - 7/2 x - 3/2
उत्तर : (1)
1) x² - 3/x + 7 ही राशी बहुपदी नाही.
कारण - 3/x या चलाचा घातांक ऋण आहे.
x² - 3/x + 7 = x² - 3x-¹ + 7
बहुपदीमध्ये प्रत्येक चलाचा घातांक ऋणेतर पूर्णांक ( शून्य किंवा धन ) असतो.
4] पुढील बहुपदीची कोटी किती? (2018)
m⁵n²p + 4m⁴n⁷ + 2/3m³n²p+ 15m²
1)11 2) 14 3)7 4)2
उत्तर : (1)
एका पेक्षा अधिक चलातील बहुपदीची कोटी बहुपदीतील प्रत्येक पदामध्ये असलेल्या चलांच्या घातांकांची सर्वात मोठी बेरीज.
m⁵n²p घातांकांची बेरीज = 5+2+1= 8
4m⁴n⁷ घातांकांची बेरीज = 4 + 7 = 11
2/3m³n²p घातांकांची बेरीज = 3 +2 +1 = 6
15m² घातांकांची बेरीज = 2
∴ बहुपदीची कोटी = 11 (सर्वाधिक बेरीज )
5] खालीलपैकी असत्य विधान कोणते?
अ ) 5/2 m + 7 ही बहुपदी आहे.
ब ) शून्य (0) या बहुपदीची कोटी 0 असते.
क ) शून्येतर स्थिर बहुपदीची कोटी 0 असते.
ड) √3 ही स्थिर बहुपदी आहे.
1) फक्त्त अ व ड 2) फक्त्त ड
3) फक्त्त अ व ब 4) फक्त्त ब
उत्तर : (4)
ब ) शून्य (0) या बहुपदीची कोटी 0 असते.
असत्य
कारण शून्य बहुपदीची कोटी निश्चित करता येत नाही.


👍
Anonymous | May 16, 2022 at 9:07 PM