मापनाची एकके (Units Of Measurements )
मापनाची एकके :
मापनाचे एकक म्हणजे लांबी(length),वस्तुमान (mass) व आकारमान (volume) इत्यादी मोजण्याचे परिमाण.
गणित व विज्ञान या विषयाचा अभ्यास करताना एकके (Units)माहित असणे आवश्यक आहे. गणित विषयातील उदाहरणे सोडविताना लांबी(अंतर ), परिमिती, क्षेत्रफळ, आकारमान (घनफळ ) इत्यादी राशींची MKS व CGS पद्धतील एकके माहित असतील तर त्यांचे रूपांतरण करता येते. उदाहरणे सोडविताना एकके समान आहेत का याची खात्री करावी.एक राशी मीटर मध्ये तर दुसरी राशी सेंटीमीटर मध्ये दिली असेल तर दोन्ही राशी एकाच प्रकारच्या एककांमध्ये रूपांतरीत करणे आवश्यक असते.एकके समान करून घेतल्यास उदाहरण अचूक सोडविता येते.
राशींची गुणोत्तरे काढताना दोन्हीही राशी एकाच एककात असाव्यात लागतात.सर्व राशींची एकके MKS किंवा CGS पद्धतीत असावी लागतात. म्हणून एककांचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. MKS व CGS पद्धतील एकके माहित असतील तर त्यांचे रूपांतरण करता येते म्हणून एककांबद्दल पुढील गोष्टी जाणून घ्या.
1) मूलभूत एकक (FUNDMENTL UNITS) : ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसऱ्या राशीवर अवलंबून नसते त्याना मूलभूत एकक म्हणतात. जसे : मीटर, किलोग्राम,सेकंद
2) साध्य एकक (DERIVED UNITS): ज्या राशी/एकके या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य राशी/एकके म्हणतात.जसे वेग,घनता, दाब.
महत्वाची एकके व रूपांतरण:
लांबी - एकके :
लांबी मोजण्यासाठी मिलीमीटर (मिमी ),सेटींमीटर (सेमी), किलोमीटर (किमी ) ही एकके वापरतात.
1 सेमी = 10 मिमी
1मीटर = 100 सेमी
1मीटर = 1000 मिमी
1 किलोमीटर = 1000 मीटर
वस्तुमान - एकके :
वस्तुमान मोजण्यासाठी मिलीग्रॅम (मिग्रॅ), ग्रॅम, किलोग्रॅम (किंग्र) ही एकके वापरतात.
1 ग्रॅम = 1000 मिलीग्रॅम
1 किलोग्रॅम = 1000 ग्रॅम
1 क्विंटल = 100 किलोग्रॅम
1 मेट्रिक टन = 1000 किलोग्रॅम
कालमापन-एकके :
मध्यान्हपूर्व - रात्री 12.00 ते दुपारी 12.00 पर्यंतचा कालावधी.
मध्यान्होत्तर - दुपारी 12.00 ते रात्री 12.00 पर्यंतचा कालावधी.
1 मिनिट = 60 सेकंद
1 तास = 60 मिनिटे
1 तास = 3600 सेकंद
1 दिवस = 24 तास
1 दिवस = 1440 मिनिटे
1 दिवस = 86400 सेकंद
1महिना = 30 किंवा 31दिवस
1वर्ष = 365 दिवस किंवा 366 दिवस (लीप वर्ष )
धारकता-एकके :
1 घन सेमी ( सेमी³) = 1000 घन मिमी (मिमी³)
1 घन सेमी ( सेमी³) = 1 मिली लीटर (ml)
1लीटर = 1000 मिली (ml)
1लीटर = 1000 घन सेमी ( सेमी³)
1लीटर = 1000 मिली (ml) = 1000 घन सेमी ( सेमी³)
कागद मापन :
1डझन = 12 कागद.....1डझन = 12 वस्तू
1दस्ता = 24 कागद
1ग्रोस = 144 कागद
1 रीम = 480 कागद
1 रीम = 480 कागद = 20 दस्ता = 40 डझन
काही नमुना प्रश्न :
1] 5 मीटर =......... सेमी
1) 5 2) 50 3) 0.05 4) 500
उत्तर : (4)
1मीटर = 100 सेमी
∴ 5 ×1 मीटर = 5 ×100 सेमी
5 मीटर = 500 सेमी
2] 3.5 किलोग्रॅम =............. ग्रॅम
1) 350 2) 3500 3) 35 4) 35000
उत्तर : (2)
1 किलोग्रॅम = 1000 ग्रॅम
∴ 3.5 × 1 किलोग्रॅम = 3.5 × 1000 ग्रॅम
3.5 किलोग्रॅम = 3500 ग्रॅम
3] 25 लीटर = ........... घन सेमी किंवा मिली
1) 0.250 2) 250 3) 25000
4) 2500
उत्तर : (3)
1लीटर = 1000 मिली (ml)
∴ 1लीटर = 1000 घन सेमी ( सेमी³)
1लीटर = 1000 घन सेमी ( सेमी³) = 1000 मिली (ml)
25 ×1लीटर = 25 × 1000 घन सेमी ( सेमी³) = 25 × 1000 मिली (ml)
25 लीटर = 25 000 घन सेमी ( सेमी³) = 25 000 मिली (ml)
4] 2 तास =........... सेकंद
1) 120 2) 7200 3) 3600 4) 1200
उत्तर : (2)
1 तास = 3600 सेकंद
∴ 2 ×1 तास = 2 × 3600 सेकंद
2 तास = 7200 सेकंद
5] 12 रीमचे एकूण कागद किती?
1) 5760 2) 144 3) 256 4) 480
उत्तर : (1)
1 रीम = 480 कागद
∴ 12 × 1 रीम = 12 × 480 कागद
12 रीम = 5760 कागद
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


उत्तम
जयसिंग पाटील | July 2, 2021 at 9:30 AM