Translate

Saturday, July 3, 2021

स्कॉलरशिप परीक्षा 88 : वस्तुमान मापन एकके (Units Of Mass Measurment)-ऑनलाईन टेस्ट

 




वस्तुमान मापन एकके (Units Of Mass Measurment)


वस्तुमान मापन एकके :

  गणित विषयात वस्तुमान मापन ही एक संकल्पना महत्वाची आहे. वस्तुमान संबंधी गुणोत्तर व प्रमाण, चलन या घटकात उदाहरणे असतात. सोने, चांदी यांसारखे मौल्यवान धातू मिलीग्रॅम या एककात मोजतात.मसाल्याचे पदार्थ, चहा पावडर व अन्न धान्य पदार्थ ग्रॅम किंवा किलोग्रॅम या एककात मोजतात.

    उदाहरणे सोडविताना उदाहरणात वस्तुमानाची एकके समान नसतील तर एकके समान करून घेतल्यास उदाहरणाचे उत्तर अचूक येते. वस्तूमानाची एकके -मिलीग्रॅम , ग्रॅम ,किलोग्रॅम  यांमधील परस्पर रूपांतरण येणे आवश्यक आहे.  वस्तुमानाच्या च्या एकककांचा अभ्यास चांगला करा.

एककांचे परस्पर रूपांतर करताना खालील माहितीचा उपयोग करा.


किलोग्रॅम -हेक्टोग्रॅम -डेकाग्रॅम -ग्रॅम -डेसिग्रॅम -सेंटीग्रॅम -मिलीग्रॅम 


1) डावीकडून उजवीकडे एकके लहान होत जातात.

2) वस्तूमानाच्या मोठ्या एककाचे लहान एककात रूपांतरण करताना गुणाकार क्रिया करावी. 

3) डावीकडील एककाचे उजवीकडील पहिल्या एककात रूपांतर करताना 10 ने गुणतात.

4) डावीकडील एककाचे उजवीकडील दुसऱ्या एककात रूपांतर करताना 100 ने गुणतात.

5) डावीकडील एककाचे उजवीकडील तिसऱ्या एककात रूपांतर करताना 1000 ने गुणतात.

6) डावीकडील एककाचे उजवीकडील चौथ्या एककात रूपांतर करताना 10000 ने गुणतात.

वरीलप्रमाणे क्रिया करा 

 जसे -

सेंटीग्रॅमचे मिलीग्रॅम करताना 10 ने गुणतात.

ग्रॅमचेचे सेमीग्रॅम करताना 100 ने गुणतात.

किलोग्रॅमचे ग्रॅम करताना 1000 ने गुणतात.


किलोग्रॅम -हेक्टोग्रॅम -डेकाग्रॅम-ग्रॅम -डेसि ग्रॅम -सेंटीग्रॅमचे -मिलीग्रॅम 

1) उजवीकडून  डावीकडे एकके मोठी होत जातात.

2) वस्तूमानाच्या लहान एककाचे  मोठ्या एककात रूपांतरण करताना भागाकार क्रिया करावी. 

3) उजवीकडील एककाचे डावीकडील पहिल्या एककात रूपांतर करताना 10 ने भागतात.

4) उजवीकडील एककाचे डावीकडील दुसऱ्या एककात रूपांतर करताना 100 ने भागतात.

5) उजवीकडील एककाचे डावीकडील तिसऱ्या एककात रूपांतर करताना 1000 ने भागतात.

6) उजवीकडील एककाचे डावीकडील चौथ्या एककात रूपांतर करताना 10000 ने भागतात.

वरीलप्रमाणे क्रिया करा 

 जसे -

मिलीग्रॅमचे सेमीग्रॅम करताना 10 ने भागतात.

सेमीग्रॅमचे ग्रॅम करताना 100 ने भागतात.

ग्रॅमचे किलोग्रॅम करताना 1000 ने भागतात.


लांबीच्या एककांवर आधारित पुढे 10 गुणांची चाचणी दिलेली आहे. आपला लांबीच्या एककांबद्दल अभ्यास तपासा. जो प्रश्न चुकेल त्या एककाचा अभ्यास करून आपले एककांबद्दल ज्ञान वाढवा.

वस्तूमानाच्या एककांचा अभ्यास करण्यासाठी Google वर Ganit Expert Hovuya लिहून मापनाची एकके सर्च करा.

जसे Ganit Expert Hovuya- मापनाची एकके 

आपला वस्तूमानाच्या  एककांचा अभ्यास आहे का हे तपासण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. लिंक वर क्लिक करा.  त्यामध्ये उदाहरणे दिलेली आहेत.

 उदाहरणे सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करावा.


1) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .


2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.


3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit  होईल .


4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे . 


4) त्यानंतर आपले किती  प्रश्न  (question ) बरोबर सोडवले आहेत  ते समजेल व  चुकलेल्या प्रश्नाच्या  ( questions )  उत्तराचे  स्पष्टीकरण (explanation)  Feedback मध्ये  आपल्याला सादर होईल. 


5) उदाहरणाचे उत्तर कोणता पर्याय येईल त्या पर्यायावर click  करावे .


पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा questions स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .

खालील लिंक वर क्लिक करा.

       👇


 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdkAc4ArGv04E9O-Pb6TYMC2LQWCvw_crC1Pptxt4WlMlIJ7w/viewform?usp=sf_link

                              

                                           👇


चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी ) एंटर  करा व प्रकाशित करा 




Post a Comment

1 Comments:

उत्तम

जयसिंग पाटील | July 18, 2021 at 8:02 AM

Post a Comment

1 comment: