यश मिळविण्यासाठी सर्वात मोठी शक्त्ती म्हणजे आत्मविश्वास.
समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म
(Properties of angles formed by two parallel lines and Transversal )
समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म |Properties of angles formed by two parallel lines and Transversal|समांतर रेषा व छेदिकेमुळे होणारे कोन, संगत कोन,व्युत्क्रम कोन, आंतरकोन यांचे गुणधर्म या विषयी माहिती घेऊ.
महत्त्वाचे मुद्दे :
1) दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर 8 कोन तयार होतात.
आकृती मध्ये रेषा RB ∥ रेषा JG आणि रेषा PA ही त्यांची छेदिका आहे.
1) संगत कोनांचा गुणधर्म (Proprety of Corresponding angles ):
समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतात.
संगत कोनांच्या एकरूप जोड्या :
1) ∠PSR ≅ ∠ SMJ
2) ∠ PSB ≅ ∠ SMG
3) ∠ RSM ≅ ∠ JMA
4) ∠ BSM ≅ ∠ GMA
2) व्युत्क्रम कोनांचा गुणधर्म (Proprety of alternate angles ):
समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतात.
आंतरव्युत्क्रम कोनांच्या एकरूप जोड्या (pairs of alternate interior angles )
1) ∠RSM ≅ ∠ SMG
2) ∠BSM ≅ ∠ SMJ
बाह्यव्युत्क्रम कोन कोनांच्या एकरूप जोड्या (pairs of alternate exterior angles )
1) ∠PSR ≅ ∠ GMA
2) ∠ PSB ≅ ∠ JMA
3) आंतर कोनांचा गुणधर्म (Proprety of interior angles ):
समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतर कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180°असते.
आंतर कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात.
1) m∠RSM + m∠ SMJ = 180°
2) m∠B SM + m∠ SMG = 180°
परीक्षेसाठी प्रश्न :
1] खालील आकृतीमध्ये रेषा AR ∥ रेषा IG व रेषा BM ही त्यांची छेदिका आहे. तर m∠NLG =?
1) 105° 2) 57° 3) 75° 4) 115°
उत्तर : ( 3 )
m∠NLG ≅ m∠ BNR....... ( संगत कोन )
m∠ BNR = 75°
∴m∠NLG = 75°
2] खालील आकृतीमध्ये रेषा AK ∥ रेषा PM व रेषा DL ही त्यांची छेदिका आहे. तर खालील पैकी व्युत्क्रम कोनांची जोडी कोणती ?
1) ∠ AVD व ∠ LSM 2) ∠ AVD व ∠ VSM
3)∠ AVD व ∠ PSV 4) ∠ AVS व ∠ VSM
उत्तर : (1 ) व ( 4 )
∠ AVD व ∠ LSM.............. बाह्यव्युत्क्रम कोन
∠ AVS व ∠ VSM................ आंतरव्युत्क्रम कोन
3] खालील आकृतीमध्ये रेषा l ∥ रेषा m तसेच रेषा p ∥ रेषा q तर m∠ d = किती?
उत्तर : ( 2 )
रेषा l ∥ रेषा m व छेदिका p
m∠ a = 78°............. ( संगत कोन )
रेषा p ∥ रेषा q व छेदिका m
.m∠ a ≅ m∠ d ...................... ( संगत कोन )
∴ m∠ a = m∠ d
78° = m∠ d
4] खालील आकृती मध्ये रेषा P ∥ रेषा Q तर m∠ z =?
1)110° 2) 220° 3) 70° 4) 180°
उत्तर : ( 3 )
m∠ x = 110°............... विरुद्ध कोन
रेषा P ∥ रेषा Q व छेदिका R
m∠ x + m∠ z = 180° ......... आंतर कोन
110° + m∠ z = 180°
m∠ z = 180° - 110°
m∠ z = 70°
5] सोबतच्या आकृतीमध्ये रेषा AD ∥ रेषा EH, रेषा X Y व रेषा PQ त्यांच्या छेदिका आहेत. m∠ CBF = 70°तर m∠ EFB =किती?
1) 110° 2) 55° 3) 125° 4) 70°
उत्तर : ( 4 )
रेषा AD ∥ रेषा EH, व छेदिका रेषा X Y
∠ EFB ≅ ∠ CBF...........( व्युत्क्रम कोन )
∴ m∠ EFB = m∠ CBF
m∠ EFB = 70°
6] दोन समांतर रेषाना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनाच्या एका जोडीतील कोनाचे माप 2x° आणि 3x° असेल तर त्या कोनांची मापे किती? (2020-21)
1) 72°, 108° 2) 144°, 36°
3) 108°, 62° 4) 120°, 60°
उत्तर : (1)
आंतर कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात.
m∠ 2x° + m∠ 3x° = 180° ......... आंतर कोन
5x° = 180°
x° = 180°/5
x° = 36°
कोनांची मापे:
2x° = 2 × 36° = 72°
3x° = 3 × 36° = 108°
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद







Best.
Unknown | May 6, 2021 at 4:14 PM