ज्ञान ही शक्त्ती आहे.
माध्यमिक शिक्षणातील गणित हा विषय अत्यंत महत्त्वाचा वि षय आहे.परंतु या विषयात अनेक सामान्य विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक दिसत नाही.गणित विषयाबाबत उदासीनता असते.गणित विषय चांगला होण्यासाठी Daily Planing करून अभ्यास करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम पायाभूत गणिताचा अभ्यास करावा. स्वयंप्रेरणेने दररोज (दिनांक लिहून )एकाअध्ययन घटकाचा अभ्यास करून त्यावरील स्वाध्याय सोडविणे,आपली उत्तरे पडताळून पाहणे.काही शंका असल्यास शिक्षक,पालक, वर्गमित्र व वरच्या वर्गातील विद्यार्थी यांचे मार्गदर्शन घ्यावे.
स्वयं अध्ययन भाग 1
अध्ययन घटक : नैसर्गिक संख्या -पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या.
1) नैसर्गिक संख्या : 1, 2, 3, 4,... या मोज संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात.
नैसर्गिक संख्या संच N= { 1, 2, 3, 4,...}
जर पहिली क्रमवार नैसर्गिक संख्या x असेल तर उदाहरणार्थ 17
दुसरी क्रमवार नैसर्गिक संख्या x +1 असते उदाहरणार्थ 17+1= 18
तिसरी क्रमवार नैसर्गिक संख्या x +2 असते उदाहरणार्थ 17+2 =19
चौथी क्रमवार नैसर्गिक संख्या x +3 असते उदाहरणार्थ 17+3= 2
सम नैसर्गिक संख्या : 2, 4, 6, 8,, 10,... या सम नैसर्गिक संख्या आहेत.
जर पहिली क्रमवार सम नैसर्गिक संख्या x असेल तर उदाहरणार्थ 36
दुसरी क्रमवार सम नैसर्गिक संख्या x +2असते. उदाहरणार्थ 36+2=38
तिसरी क्रमवार सम नैसर्गिक संख्या x +4असते उदाहरणार्थ 36+4=40
चौथी क्रमवार सम नैसर्गिक संख्या x+6असते. उदाहरणार्थ 36+6= 42
विषम नैसर्गिक संख्या : 1, 3, 5, 7,... या विषम नैसर्गिक संख्या आहेत.
उदाहरणार्थ
जर पहिली क्रमवार विषम नैसर्गिक संख्या x असेल तर उदाहरणार्थ 13 + 6 = 19
दुसरी क्रमवार विषम नैसर्गिक संख्या x + 2 असते. उदाहरणार्थ 13+2 =15
तिसरी क्रमवार सम नैसर्गिक संख्या x + 4 असते उदाहरणार्थ 13+4 = 17
चौथी क्रमवार सम नैसर्गिक संख्या x +6 असते. उदाहरणार्थ 13+6 = 19
पूर्ण संख्या : 0, 1, 2, 3, 4,... या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात.
पूर्ण संख्यांचा संच W = { 0, 1, 2, 3,...}
पूर्णांक संख्या : ..., -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4,... या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात.
पूर्णांक संख्यांचा संच I = {...., -3, -2, -1, 0, 1, 2, 3......}
स्वाध्याय : खालील विधाने पूर्ण करा.
1) चार क्रमवार नैसर्गिक संख्या y ,................., y+2, ...........
2) चार क्रमवार सम नैसर्गिक संख्या..............., y+2, ........., y+6
3) चार क्रमवार विषम नैसर्गिक संख्या m,............., m+4,..............
4)............ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे.
5)शून्य, धन पूर्णांक व ऋण पूर्णांक मिळून तयार होणाऱ्या संख्यांना .............. संख्या म्हणतात.
उत्तरे : 1) y+1, y+3
2) y, y+4
3) m+2, m+6
4) 0
5) पूर्णांक.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद


Nice...
Ajay Patil | September 8, 2020 at 2:26 PM👍👌
Unknown | September 8, 2020 at 2:42 PMNice sir..
Anonymous | April 9, 2021 at 8:50 PM