माहिती मिळविण्यासाठी किंवा ज्ञानग्रहणासाठी वाचन कौशल्य हवेच.
1 ची जादू ( MAGIC OF ONE )
1 ची जादू | Magic of One| हा भाग
`Ganit Expert´ व्हायचे असेल तर शांत राहू नका.चोवीसतास गणिताचे वाचन,लेखन, मनन, चिंतन व उजळणी करण्याचा प्रयत्न चालू ठेवा. प्रत्येक घटनेकडे गणिती दृष्टिकोनातून पहा. तुम्ही नक्कीच गणितात `Expert´होणार.
गणित हा विषय सोपा आहे. परंतु हा विषय खूप अवघड आहे अशी गैरसमजूत झालेली दिसते. गणित हा विषय अधिक चांगल्याप्रमाणे समजण्यासाठी दररोज कमीत कमी 10 मिनिटे गणिती क्रियांचा, नियमांचा, सूत्रांचा, गुणधर्मांचा अभ्यास, सराव करणे आवश्यक आहे. अभ्यासामुळे मेंदू (Brain)विकसित होतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट लक्षात ठेवणे सहज सोपे होते.गणित विषय चांगला समजतोच त्याचबरोबर इतर विषयही समजायला सोपे होतात.याचा पडताळा घेण्यास प्रत्यक्ष अनुभव घेणे गरजेचे आहे. गणित शिकण्याचे अनेक मार्ग आहेत.शालेय शिक्षणातील गणित, गणिती उपक्रम, गणिती कोडी, गणित प्रश्नमंजुषा, स्पर्धा परीक्षेतील उदाहरणे, गणिती पुस्तकांचे वाचन इत्यादी कृतीतून गणित शिकता येते.असामान्य बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी `Ganit Expert´होऊ शकतो परंतु सामान्य विद्यार्थी गणितात एक्स्पर्ट होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे गणितातील सामान्य मूलभूत क्रिया येणे गरजेचे आहे.मूलभूत क्रिया येण्यासाठी व संबंधित नियम, सूत्रे, गुणधर्म, सिद्धांत,प्रमेय माहीत होण्यासाठी अनेक प्रकारच्या कृतियुक्त अध्ययनाची गरज आहे.
मी एक नावीन्यपूर्ण अध्ययन कृती देत आहे. या कृतीमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास गणिताच्या महासागरातील एका बिंदू इतका होईल आणि अशाच अनेक अध्ययन कृतींमुळे विध्यार्थ्यांच्या अभ्यासाची व्याप्ती गणिताच्या महासागरातील वर्तुळासारखी वाढत राहील.
अध्ययन कृती :
उदाहरणाचे उत्तर 1 येईल अशी उदाहरणे तयार करणे व त्या उदाहरणात कोणते नियम /सूत्रे /गुणधर्म /सिद्धांत /प्रमेय यांचा वापर केलेला आहे त्याची नोंद करणे.
नमुना उदाहरणे
1) 5° = 1, नियम a° = 1
2) y या एकपदीचा सहगुणक = 1, चलासोबत असणाऱ्या संख्येला सहगुणक म्हणतात.
3) 100 सेंटीमीटर = 1 मीटर 1मीटर चे 100सेंटीमीटर असतात.
4) 89° मापाच्या कोटीकोनाचे माप = 1° कोटीकोनांची बेरीज 90° असते.
5)आयताची लांबी 0.5मीटर, रुंदी 2मीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ =1 चौरस मीटर
आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रूंदी
इतर उदाहरणे
1) 1/4+1/4+1/4+1/4 =1
2) 1.5 -0.5 =1
3) 9/7×7/9= 1
4) 5xyz ÷ 5xyz = 1
5) 10 या परिमेय संख्येचा छेद = 1
6) 1/17 या परिमेय संख्येचा अंश = 1
7) 0+1 =1
8) 1 चा वर्ग = 1
9) 1 चे वर्गमूळ = 1
10) 1चा घन = 1
11) 1 चे घनमूळ = 1
12) (1/a)× a =1
13) 47 व 48 म. सा. वी. (H.C.F.)= 1
14) 4x+5y+3z मध्ये सामाईक अवयव = 1
15) जर (-1) + y = 0 तर y = 1
16) -x+ y= 1/2 & y = 3/2 तर x = 1
17) | 4-5 | = 1
18) ( -5 )° = 1
19) 5x ची कोटी (Degree) = 1
20) चौरसाची बाजू 0.25 सेमी असेल तर त्याची परिमिती =1 सेमी
21) वर्तुळाची त्रिज्या 0.5 सेमी असेल तर वर्तुळाचा व्यास = 1 सेमी
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• •
धन्यवाद



Superb
Unknown | September 1, 2020 at 9:43 PM💐👍
Unknown | September 1, 2020 at 9:53 PMउत्तम
जयसिंग पाटील | July 11, 2021 at 11:15 AMउत्तम
जयसिंग पाटील | July 12, 2021 at 10:52 AMGood sir insted of most pld education of maths u also good update about maths also technology it's reamin awareness about teacher professionals updates
Unknown | November 5, 2021 at 8:55 AM👌🏻
Anonymous | July 7, 2025 at 9:59 PM