परिश्रम म्हणजे जीवनाच्या साफल्याचे रहस्य.
गणितातील वर्ग व वर्गमूळ |Square and Square Root - varg and vargmul |हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. वर्ग व वर्गमूळ या संकल्पनेचा अभ्यास चांगला करणे गरजेचे आहे कारण उदाहरणे सोडविताना अनेक वेळा संख्येचा किंवा बैजिक राशीचा वर्ग करणे, वर्गमूळ घेणे या क्रिया कराव्या लागतात.वर्ग व वर्गमूळ या संकल्पना नीट समजून घेतल्यास वर्ग करणे, वर्गमूळ घेणे यात अचूकता येते.NMMS, SCHOLARSHIP, इतर स्पर्धा परीक्षांमध्ये वर्ग व वर्गमूळ यांवर आधारित उदाहरण वारंवार विचारले जाते. काही नमुना उदाहरणे अभ्यासासाठी दिलेली आहेत. त्यांचा अभ्यास करा, परीक्षेसाठी निश्चितच उपयोग होईल.
उदाहरणे :
1] (2.5)² - (-0.5)² = किती ?
1) 2 o2) 3 3) 6 4) 25
उत्तर :(3)
(2.5)² - (-0.5)²
6.25- (0.25)
= 6.25 - 0.25
= 6
2] (144)⁰·⁵ ÷ (16)⁰·⁵ = किती ?
1) 9 2 ) 3 3 ) 8 4) 4
उत्तर : (2)
(144)⁰·⁵ ÷ (16)⁰·⁵
= 144¹/² ÷ 16¹/² (0.5= 1/2)
= √(144 ) ÷ √(16 ) ( a½ = √a )
= 12 ÷ 4
= 3
3] ( 6² + 8² )¹/² = .......................
1 ) √(10 )² 2 ) 10 3 ) 10¹/² 4 ) 50
उत्तर : (1) आणि (2)
( 6² +8² )¹/²
= ( 36 + 64 )¹/²
= (100)¹/²
= √(100 ) ( a¹² = √ a )
= 10
=√(10)² ( a = √a² )
4 ] √(121 ) = 11 √(0.0121 ) =.............
1 ) 1.1 2) 0.0011 3) 0.011 4) 0.11
उत्तर : (4)
दशांश अपूर्णांक संख्येत दशांश चिन्हानंतर जर n
स्थळे असतील तर वर्गमूळ संख्येत दशांश
चिन्हानंतर n/2 स्थळे असतात.
0.0121 या संख्येत दशांश चिन्हानंतर 4 स्थळे आहेत म्हणून वर्गमूळात 2 स्थळे
5] जर (√9 )² - (√0.1 )² = x तर x = किती ?
1) 80.9 2) 80 3) 8.09 4) 8.9
उत्तर : (4)
(√9 )² -(√0.1 )² = x
9 - 0.1 = x [ (√a)² = a) ]
8.9 = x
∴ x = 8.9
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन कोणता?
उत्तर 👇
General Knowledge - आजचा प्रश्न
✍️ आणि हा लेख उपयुक्त वाटला तर जरूर शेअर करा.
लेखक: Ganit Expert Hovuya
श्री.जे.एम.पाटील
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:8329467192
📱 WhatsApp: 9405559874
📌 स्पर्धा परीक्षांसाठी गणित मार्गदर्शन
अजून अशाच उपयुक्त माहितीकरिता भेट द्या
https://ganitexperthovuya.blogspot.com



rpowar363@gmail.com
Unknown | August 18, 2021 at 8:44 AMOmkar Badad
Anonymous | July 24, 2023 at 8:56 PM