प्रत्येक दिवस नवा विचार व नवी ऊर्जा घेऊन येत असतो.
स्वयं अध्ययन (Self Learnning)
मित्रहो शिक्षण प्रक्रियेत स्वयं अध्ययन या संकल्पनेला अतिशय महत्त्व आहे. स्व -अध्ययन हे बालकाच्या सुप्त क्षमतांचा विकास करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.म्हणून विद्यार्थ्यांनी स्व प्रयत्नांनी शिकावे.
स्वयं अध्ययन भाग : (6)
अध्ययन घटक : वर्गमूळ ( Square Roots)
वर्गमूळ : दिलेली संख्या (बैजिक राशी) ज्यासंख्येचा (बैजिक राशीचा) वर्ग असतो त्या संख्येला (बैजिक राशीला) दिलेल्या संख्येचे (बैजिक राशीचे )वर्गमूळ म्हणतात.
a चा वर्ग a² म्हणून a² चे वर्गमूळ a
3 चा वर्ग 9 म्हणून 9 चे वर्गमूळ 3
महत्त्वाचे मुद्दे :
1) वर्गमूळ दर्शविण्यासाठी √ हे चिन्ह वापरतात.
उदा. 25 चे वर्गमूळ = √25 = 5
2) a² चे वर्गमूळ = √(a²) = a
उदा. 7² चे वर्गमूळ = √7² = 7
3) a²+2ab+b²चे वर्गमूळ
= √(a²+2ab+b²) = a+b
म्हणजेच (a+b)² चे वर्गमूळ =√(a + b)² = a + b
4) प्रत्येक धन वास्तव संख्येसाठी दोन वर्गमुळे असतात.
√(a² ) = ± a
उदा. √(100 ) =± 10
1) धन वर्गमूळ √( 100) = 10 असे लिहितात.
2) ऋण वर्गमूळ -√( 100) = -10 असे लिहितात.
5) वर्गमूळ दर्शविण्यासाठी घातांक 1/2 लिहितात.
a चे वर्गमूळ = a¹/²
उदा. 16 चे वर्गमूळ = 16¹/²
a चे वर्गमूळ = √a = a¹/²
6) दशांश अपूर्णांक संख्येत दशांश चिन्हाच्या पुढे (उजवीकडे) जेवढी स्थळे असतात त्याच्या निमपट स्थळे वर्गमूळ संख्येत असतात.
उदा. √0·0025 = 0·05
7) a , b कोणत्याही धन वास्तव संख्यांसाठी,
√(a × b) = √a × √b
उदा. √(9×81) = √9 × √81
8) a , b कोणत्याही धन वास्तव संख्यांसाठी,
√(a/b) =√a /√b
उदा. √(64/121) = √64 / √121
उदाहरणे :
1] चिन्हात लिहा.
a)37 चे वर्गमूळ b) m चे वर्गमूळ
2] वर्गमुळे लिहा.
a) 289 b)169 c) n²
d) o.16 e) 0.49/144
3] किंमत लिहा.
d) √(a²/b² ) e) √( 0.0009 )
उत्तरे :
1] a)√37 b)√m
2] a) 17 b) 13 c) n d) 0.4 e) 0.7/12
3] a) -16 b ) 9 c) 50 d) a/b e) 0.03
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सर्व पोस्टसाठी खालील लिंकवर क्लीक करा 👇

Post a Comment