वाचनासाठी वेळ द्या, कारण तो ज्ञानाचा पाया आहे.
घन (Cube) :
घन करणे म्हणजे तीन वेळा गुणाकार करणे
तीन वेळा गुणाकार केल्यास येणारा गुणाकार हा घन असतो.
a चा घन = a × a × a
5 चा घन = 5 × 5 × 5 = 125
घन दर्शविण्यासाठी घातांक 3 लिहितात.
a³ = a × a × a
4³ = 4 × 4 × 4 = 64
* महत्त्वाचे नियम *
1 ) धन (+) संख्येचा घन धन (+) संख्या असते.
उदारणार्थ : 2³ = 8
2) ऋण संख्येचा घन ऋण (-) संख्या असते.
उदाहरणार्थ : (-1 )³ = -1
3) सम संख्येचा घन सम संख्या असतो.
उदाहरणार्थ : 6³ = 216
4) विषम संख्येचा घन विषम संख्या असतो.
उदाहरणार्थ : 7³ = 343
5) संख्येचा घन हा संख्या व संख्येचा वर्ग यांचा गुणाकार असतो.
a³ = a × a²
उदाहरणार्थ : 3³ = 3 × 3²
3³ = 3 × 9
3³ = 27
6) पूर्णांक संख्येच्या घनाला पूर्ण घन संख्या म्हणतात.
उदाहरणार्थ : 1, 8, 27, 64,125, -1, -8 , - 27
7) (ab)³ = a³ × b³
उदाहरणार्थ : ( 2 × 5 )³ = 2³ × 5³
( 10 )³ = 2³ × 5³
= 8 × 125
= 1000
8) ( a / b )³ = a³ / b³
उदाहरणार्थ : ( 3 / 8 )³ = 3³ / 8³
= 27 / 512
9) दशांश अपूर्णांक संख्येचा घन :
संख्येत दशांश चिन्हाच्या नंतर x स्थळे असतील तर घन संख्येत दशांश चिन्हाच्या नंतर 3x (तिप्पट ) स्थळे असतात.
उदाहरणार्थ : (0.05) = 0.000125
10) 1 पासूनच्या n पर्यंतच्या क्रमवार संख्यांच्या घनांची बेरीज :
1³+ 2³+ 3³ +...+ n³ = ( 1 + 2 + 3 +...+ n )²
उदाहरणार्थ : 1³ + 2³ + 3³ = ( 1 + 2 + 3 )²
1 + 8 + 27 = ( 6 )²
36 = 36
परीक्षेसाठी उदाहरणे :
1) 23 चा घन किती?
1)) 12167 2) 6859 3) 13824 4) 19683
उत्तर : ( 1 )
( 23 )³ = 23 × 23 × 23
= 529 × 23
= 12167
2) (-2/7)³ = किती?
1) 8/ 343 2) 4/49 3) -4/49 4) -8/343
उत्तर : (4) l
(-2 / 7 )³ = - 2³ / 7³
= - 8 / 343 [ऋण (-) संख्येचा
घन ऋण (-) संख्या असते.]
3] (0.003 )³ = x तर x ची किंमत किती?
1) 0. 000009 2) 0.000027
3) 0.000000027 4) 0.027
4] खालील पैकी कोणती संख्या पूर्ण घन आहे?
1) 1133 2) 1331 3)1313 4) 3311
उत्तर : (2)
(11)³ = 1331
5] जर (1³+ 2³+ 3³+ 4³) = p तर p ची किंमत किती?
1) 100 2) 10 3) 1000 4) - 100
उत्तर : ( 1)
1 पासून n पर्यंतच्या क्रमवार संख्यांच्या घनांची बेरीज
= 1³+ 2³+ 3³ +...+ n³ = ( 1 + 2 + 3 +...+ n )²
उदाहरण :
1³+ 2³ + 3³ + 4³ ) = (1 + 2 + 3 + 4 )²
= ( 10 )²
= 100
6] खालील पैकी कोणती संख्या पूर्ण घन नाही?
1) 729 2) 512 3) 675 4) 2197
उत्तर : (3 )
9³ = 729
8³ = 512
13³ = 2197
7] (- m/n )³ =...........
1) m³/n³ 2) m/n 3) - m³/n³ 4) mn
उत्तर : ( 3 )
3³ = 27
(0.003)³ = 0.000000027 [संख्येत दशांश चिन्हाच्या नंतर x स्थळे असतील तर घन संख्येत 3 x (तिप्पट ) स्थळे असतात. ]
8] 19² × n ही पूर्ण घन संख्या आहे. तर n ची किंमत किती?
1) 18 2) 19 3) 17 4) 21
उत्तर : (2)
19³ = 19 × 19²
[ पूर्णांक संख्येच्या घनाला पूर्ण घन संख्या म्हणतात.
संख्येचा घन हा संख्या व संख्येचा वर्ग यांचा गुणाकार असतो. ]
9] (√3)³ ची किंमत किती?(2015)
1)3√3 2) 27 3) √3 4) 9
उत्तर : (1)
(√3)³ = √3 ×( √3)² [ संख्येचा घन हा
संख्या व संख्येचा वर्ग यांचा गुणाकारअसतो. ]
= √3 × 3 [ (√a)² = a ]
10] [ ( - 1 )³]² = .......
1) - 6 2) 6 3) -1 4) 1
उत्तर : ( 4 )
[ ( - 1 )³]² = (- 1 )³ × (-1 )³
= ( - 1 ) × ( - 1 ) [ ऋण संख्येचा घन ऋण (-) संख्या असते. ]
= 1
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद



ब्लॉग छान केला आहे गणिताच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी आपण उदाहरणाच्या माध्यमातून उत्तम रीतीने मांडले आहात
Rahul Mane kolhapur | March 22, 2021 at 6:52 AMएक दोन त्रुटी आहेत तेवढे दुरुस्त कराव्यात
This comment has been removed by the author.
Prakash Harchekar | June 12, 2021 at 1:21 PMThose who want to learn Maths, this blog posts are very useful.... Keep posting sir & thanks for the same.
Prakash Harchekar | June 12, 2021 at 1:23 PMuyou7
Unknown | October 3, 2021 at 10:30 AM