ध्येयासाठी प्रयत्न करण्यात समाधान असते. ध्येय गाठण्यात नव्हे.
व्यस्त चलन / (Inverse Variation):
जेव्हा x हे चल y या चलावर अशा रीतीने अवलंबून असते की x y = k (k स्थिरपद ), तेव्हा x आणि y व्यस्त चलनात आहेत असे म्हणतात.
x आणि yया राशी व्यस्त चलनातअसताना:
1) जर x च्या किंमतीमध्ये वाढ झाली तर y च्या किंमतीत त्याच प्रमाणात घट होते.
2) जर x च्या किंमतीमध्ये घट झाली तर y च्या किंमतीत त्याच प्रमाणात वाढ होते.
महत्वाचे मुद्दे :
1) x आणि y यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे हे चिन्हात x ∝ 1/y असे लिहितात.
चलनाचे विधान : x ∝ 1/y
2) x ∝ 1/ y हे समीकरणाच्या रूपात x × y = k असे लिहितात. येथे k हे स्थिरपद आहे.
3) जर x ∝ 1/ y तर x × y= k असते.
जर x × y= k तर x ∝ 1/ y असते.
4) चलनाचे समीकरण : x × y = k
k हा चलनाचा स्थिरांक आहे.
5) व्यस्त चलनात संगतमूल्यांचा गुणाकार स्थिर असतो.
x1×y1 = x2×y2 = x3×y3 = k (k स्थिरपद)
6) व्यस्त चलन असणारी काही उदाहरणे :
1) ठराविक काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ /दिवस (x) आणि काम काम पूर्ण करण्यासाठी लागणारे मजूर (y)यांमध्ये व्यस्त चलन असते.
चलनाचे विधान : x ∝ 1/y
चलनाचे समीकरण : x × y = k (k स्थिरपद)
2) कवायतीसाठी प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या (a) आणि रांगांची संख्या (b) यांमध्ये व्यस्त चलन असते.
चलनाचे विधान : a ∝ 1/b
चलनाचे समीकरण : a × b = k (k स्थिरपद)
3) ठराविक अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ (t)आणि वाहनाचा वेग (v) यांमध्ये व्यस्त चलन असते.
चलनाचे विधान : t ∝ 1/v
चलनाचे समीकरण : t × v = k (k स्थिरपद)
चलन घटकावरील उदाहरणे सोडविण्यासाठी कृती :
1) उदाहरणातील माहितीनुसार प्रथम चलनाचे विधान लिहा. चलनाचे विधान दिलेले नसल्यास सारणीतील संगतमूल्यांचा गुणाकार स्थिर येत असेल तर व्यस्त चलनाचे विधान लिहा.
2) चलनाच्या विधानावरून समीकरण लिहा.
3) x व y च्या संगत मूल्यांवरून (किमतींवरून ) चलनाचा स्थिरांक (k) काढा.
4) चलनाच्या स्थिरांकाची (k ची) किंमत समीकरणात लिहून चलनाचे समीकरण लिहा.
5) चलनाच्या समीकरणात दिलेली एका चलाची (राशीची ) किंमत ठेवा व दुसऱ्या चलाची (राशीची ) किंमत काढा.
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] जर x ∝ 1/y, जर x = 72 असताना y = 8 तर x = 48 असताना y ची किंमत किती? (2019-20)

1) 14 2) 12 3) 13 4) 12.5
उत्तर : (2)
सारणीतील निरीक्षणावरून
a×b = 11×60 = 660
a×b = 15× 44 = 660
a×b = 22×30 = 660
a×b = 660
a = x, b = 55 ठेवू
x × 55 = 660
x = 660/55
x = 12
दुसरी पद्धत :
1) चलनाचे विधान दिलेले नाही. सारणीतील संगत मूल्यांचा गुणाकार करू.
a×b = 11×60 = 660
a×b = 15× 44 = 660
a×b = 22×30 = 660
सारणीतील संगत मूल्यांचा गुणाकार स्थिर येतो.
a × b = k
∴ a ∝ 1 / b
2) a × b = k
3) 11 × 60 = k
660 = k
चलनाचा स्थिरांक (k) = 660
4) a × b = 660 ...... चलनाचे समीकरण
5) जेव्हा b = 55 तेव्हा a =?
a × b = 660...... चलनाचे समीकरण
a × 55 = 660
a = 660/55
a = 12
3] जर x ∝ 1/y, जर x =100 असताना y = 0.4 तर x = 8 असताना y ची किंमत किती? (2016-17)
उत्तर : (1)
सारणीतील निरीक्षणावरून
m × n = 72 × 1/2 = 36
m × n = 9 × 4 = 36
m × n = 2 × 18 = 36
m × n = 36
m = 3.6, n = x ठेवू
3.6 × x = 36
x = 36/3.6
x = 360/36 ....(अंशाला व छेदाला 10 ने गुणून )
x = 10
1) ab = 130 2) ab = 120 3) ab = 145 4) ab = 115
उत्तर : (4)
a ∝ 1 / b
a × b = k
23 × 5 = k
k = 115
चलनाचा स्थिरांक (k) = 115
a × b = 115 ...... चलनाचे समीकरण
......................................................................................................................................
खालील उदाहरणाचे उत्तर टिप्पणी मध्ये एंटर करा. उत्तराचा क्रमांक लिहा.
ध्वनीची तरंगलांबी (l) आणि वारंवारता (f) यांमध्ये व्यस्त चलन असते. हे विधान चलनाचे चिन्ह वापरून कसे लिहिता येईल?
1) l ∝ 1/ f 2) l × f = k
3) l / f = k 4) l ∝ f
प्रश्न: अभियंता दिन 15 सप्टेंबर कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो?
उत्तर 👇
General Knowledge - आजचा प्रश्न
✍️ आणि हा लेख उपयुक्त वाटला तर जरूर शेअर करा.
लेखक: Ganit Expert Hovuya
श्री.जे.एम.पाटील
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:8329467192
📱 WhatsApp: 9405559874
📌 स्पर्धा परीक्षांसाठी गणित मार्गदर्शन
अजून अशाच उपयुक्त माहितीकरिता भेट द्या
https://ganitexperthovuya.blogspot.com



Good
जयसिंग पाटील | August 14, 2021 at 11:23 AM1
Anonymous | November 4, 2022 at 4:22 PM