भविष्याचा अंदाज करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.
विभाजित स्तंभालेख व शतमान स्तंभालेख
(Subdivided bar diagram and Percentage
bar diagram)
विभाजित स्तंभालेख :
दोन किंवा अधिक घटकांची माहिती एकाच स्तंभात दाखवली जाते.
शतमान स्तंभालेख :
दिलेली माहिती शतमानात रूपांतरित करून जो विभाजित स्तंभालेख काढतात, त्याला शतमान स्तंभालेख म्हणतात. म्हणजेच शतमान स्तंभालेख हे विभाजित स्तंभालेखाचे विशेष रूप असते.
शतमान स्तंभालेखात सर्व स्तंभ 100 एकक उंचीचे घेतात.
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] दिलेली माहिती शतमानात रूपांतरित करून जो विभाजित स्तंभालेख काढतात त्याला............... म्हणतात.
1) विभाजित स्तंभालेख 2) जोडस्तंभालेख 3) स्तंभालेख 4) शतमान स्तंभालेख
उत्तर : (4)
2] आलेखावरून A तुकडीतील एकूण विद्यार्थी व त्यातील मुलींची संख्या किती?
1) अनुक्रमे 50 व 30 2 ) अनुक्रमे 50 व 20 3 ) अनुक्रमे 45 व 20 4) अनुक्रमे 80 व 30
उत्तर : ( 2 )
A तुकडीत मुली =20
A तुकडीत मुलगे =30
A तुकडीतील एकूण विद्यार्थी = 50
3] आलेखावरून कोणत्या तुकडीतील मुलींचे शेकडा प्रमाण 80 आहे?
1) B 2) A 3) D 4) C
उत्तर : ( 3 )
D तुकडीत मुलगे = 20 %
D तुकडीत मुली = 80 %
4] आलेखावरून धनौडी गावातील पुरुष मजुरांची संख्या स्त्री मजुरांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत ?
1) 80 2) 20 3) 40 4) 120
उत्तर : ( 3 )
धनौडी गावातील पुरुष मजुरांची संख्या = 80
धनौडी गावातील स्त्री मजुरांची संख्या = 40
∴ धनौडी गावातील पुरुष मजुरांची संख्या स्त्री मजुरांच्या संख्येपेक्षा 80 - 40 = 40 ने जास्त आहेत.
5] दिलेल्या सारणीवरून गणितात श्रेणी A मध्ये आलेले B तुकडीतील विद्यार्थी शेकडा किती?
1) शेकडा. 60 2) शेकडा. 30 3 ) शेकडा. 33.33 4 ) शेकडा. 33
उत्तर : ( 1 )
B तुकडीतील एकूण विद्यार्थी = 55
गणितात श्रेणी A मध्ये आलेले B तुकडीतील विद्यार्थी = 33
B तुकडकीतील विद्यार्थ्यांचे शे.. प्रमाण x मानू.
x / 100 = 33 / 55
x × 55 = 100 × 33
x = 100 × 33 / 55
x = 100 × 3 / 5............... अंशाला व छेदाला 11 ने भागून
x = 20 × 3 ............... अंशाला व छेदाला 5 ने भागून
x = 60
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद





Nice to see you all
Unknown | December 26, 2020 at 8:04 AM