Translate

Sunday, February 21, 2021

NMMS-SCHOLARSHIP-EXAM : 52-NMMS-SCHOLARSHIP-EXAM : 52 - त्रिकोणांची एकरूपता ( Congruence Of Triangles ): 1

 


शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.








      

 त्रिकोणांची एकरूपता      ( Congruence Of Triangles )

 

 1) त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकास - एक संगती :

 दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमध्ये 6 प्रकारे एकास एक संगती लावता येते. 

ΔABC व ΔPQR यांच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगती खालील सहा प्रकारे लावता येते. 





1)ABC  PQR    (A↔P, B↔Q, C↔R)

2)ABC  QRP     

3)ABC  RPQ     

4)ABC  RQP

5)ABC  QPR

6)ABC  PRQ


2) ABC  PQR या एकास - एक संगतीत  संगत बाजूंच्या तीन  व संगत कोनांच्या तीन जोड्या खालीलप्रमाणे असतात. 


1)बाजू AB ↔बाजू  PQ       1)∠A  ∠P

2)बाजू BC ↔बाजू  QR        2)∠B Q

3) बाजू CA ↔बाजू  RP        3)∠C∠R



2) एकरूप त्रिकोण (Congruent Triangles) :


1) दोन त्रिकोण तंतोतंत जुळण्यासाठी, शिरोबिंदूंच्या 6 विविध संगतींपैकी एक तरी संगती अशी असावी की, जिच्यामुळे त्रिकोणांच्या संगत बाजू आणि संगत कोन एकरूप होतील. 


2) जर दोन त्रिकोणांच्या  शिरोबिंदूमधील विशिष्ट अशा( दिलेल्या ) एकास - एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या तीन बाजू व तीन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू व संगत कोनांशी    एकरूप असतील  तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. 




3) ABC  PQR या संगतीनुसार ΔABC व ΔPQR हे दोन त्रिकोण एकरूप सतील तर पुढील सहा बाबी एकरूप असतात. 


एकरूप संगत बाजू         एकरूप संगत कोन 

बाजू AB बाजू PQ     ∠A∠P

बाजू BC ≅बाजू QR     ∠B∠Q

बाजू AC ≅बाजू PR     ∠C∠R



परीक्षेसाठी उदाहरणे :


1] दोन त्रिकोणांच्या तीन - तीन बाजूंमध्ये किती एकास एक संगती असतात? 

1) 3           2) 9           3) 1          4) 6


उत्तर : (4)


2] ΔABC हा  Δ MNP शी एकरूप आहे. हे विधान चिन्हात पुढीलपैकी कोणत्या प्रकारे लिहितात? 

1) ΔABC  Δ MNP

2) ΔABC  ≅  Δ MNP

3) ΔABC  =  Δ MNP

4) ΔABC  ⋍  Δ MNP


उत्तर : (2)


3] ΔSTR  Δ TSR तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? 

a) ∠S ∠S

b) ∠S ∠T

c) ∠R ∠R

d) ∠T ∠T


1) a  व  b       2)  a, b  व  c       3) b  व c

    4) फक्त्त  d 


उत्तर : (3)


एकरूप त्रिकोणांचे संगत कोन एकरूप असतात. 

∠S ∠T

∠T ∠S

∠R ∠R


4] ΔABC  Δ XYZ तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? 

1) रेख BC≅ रेख YZ       ∠B ∠Z

2) रेख BC रेख XY           ∠B ∠Y

3) रेख BC≅ रेख YZ        ∠C ∠Z

4 रेख AC≅ रेख YZ         ∠C ∠Z


उत्तर : (3)


एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू व  संगत कोन एकरूप असतात. 


बाजू AB बाजू XY    ∠A∠X

बाजू BC ≅बाजू YZ     ∠B∠Y

बाजू AC ≅बाजू XZ     ∠C∠Z


5] ΔABC  Δ BCA असल्यास पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? 

1) ΔABC हा काटकोन त्रिकोण आहे. 

2) ΔABC हा समभुज त्रिकोण आहे. 

3) ΔABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. 

4) ΔABC हा विशालकोन त्रिकोण आहे. 


उत्तर : (2)


दोन त्रिकोण एकरूप सतील तर संगत कोनांच्या तिन्हीही जोड्या एकरूप असतात. 

∠A∠B,  ∠B∠C,    ∠C∠A

  ∴∠A∠B ∠C 


∴m∠A = m∠B = m∠C = 60°


ΔABC हा समभुज त्रिकोण आहे. 


•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

                                            धन्यवाद 

Post a Comment

0 Comments:

Post a Comment

0 Comments:

Post a Comment