व्यवहारी अपूर्णांक संख्यांचा गुणाकार
गणिताच्या अभ्यासात अपूर्णांक हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. रोजच्या व्यवहारात, स्वयंपाकात, माप-तोलात किंवा कुठल्याही गणनांमध्ये अपूर्णांक संख्यांचा वापर केला जातो. आज आपण व्यवहारी अपूर्णांक संख्यांचा गुणाकार कसा करायचा हे उदाहरणांसह समजून घेणार आहोत.
गणित शिकण्यासाठी व आपला गणित विषय चांगला होण्यासाठी गणितातील अनेक छोटी छोटी कौशल्य आपल्याला आली पाहिजेत. आज असेच एका महत्त्वाच्या छोट्या कौशल्याचा सराव करूया. उदाहरणे सोडविताना व्यवहारी अपूर्णांक संख्यांचा गुणाकार करावा लागतो. गुणाकार करण्याचे कौशल्य नसल्यास गुणाकार चुकतो. उत्तर चुकते.परिणामी आपले गुण जातात. यासाठी गुणाकाराचा सराव करा. ऑनलाईन टेस्ट च्या माध्यमातून आपल्या गुणाकार कौशल्याच्या बाबतीत पडताळा घ्या.
🔹 अपूर्णांक म्हणजे काय?
अपूर्णांक (Fraction) म्हणजे एखाद्या संख्येचा भाग दाखवणारी संख्या.
उदा:
- 1/2 (अर्धा)
- 3/4 (चार भागांपैकी तीन भाग)
🔹व्यवहारी अपूर्णांकांचे गुणाकार कसे करायचे?
👉 दोन किंवा अधिक अपूर्णांकांचा गुणाकार करताना लक्षात ठेवा:
व्यवहारी अपूर्णांक संख्यांचा गुणाकार :
a/b व c/d हे अपूर्णांक असतील तर
a /b × c/d = a × c / b × d
व्यवहारी अपूर्णांक संख्यांचा गुणाकार = अंशांचा गुणाकार / छेदांचा गुणाकार.
- अंशातील संख्यांचा (वरच्या संख्या -Numerators) गुणाकार अंशात लिहा.
- छेदातील संख्यांचा ( खालच्या संख्या - Denominators) गुणाकार छेदात लिहा.
उदा. 7/10 × 2 /13
= 7 × 2 / 10×13
= 14 / 130
= 7/ 65 - संक्षिप्त रूप
🔹 व्यवहारी उपयोग :
✅ अन्नातील घटकांचे प्रमाण मोजणे
✅ वस्त्र लांबी मोजमाप
✅ शेतीतील खंडांचे भाग
✅ सूक्ष्म मोजमाप
खालील चाचणी सोडवा
आपल्याला या प्रकारच्या उदाहरणांचा सराव होण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. लिंक वर क्लिक करा. त्यामध्ये उदाहरणे दिलेली आहेत.
उदाहरणे सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करावा.
1) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.
3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit होईल .
4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे .
4) त्यानंतर आपले किती प्रश्न (question ) बरोबर सोडवले आहेत ते समजेल व चुकलेल्या प्रश्नाच्या ( questions ) उत्तराचे स्पष्टीकरण (explanation) Feedback मध्ये आपल्याला सादर होईल.
5) उदाहरणाचे उत्तर कोणता पर्याय येईल त्या पर्यायावर click करावे .
पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा questions स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
खालील लिंक क्लिक करा.
👇
चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी )
एंटर करा व प्रकाशित करावर क्लिक करा


सर मी उदाहरणे सोडवली मला १० पैकी ९ पडले
Anonymous | June 28, 2024 at 9:59 PMसर मी उदाहरणे सोडवली मला १० पैकी ९ पडले
Anonymous | June 28, 2024 at 10:02 PMसर मी उदाहरणे सोडवली मला १० पैकी
Anonymous | June 28, 2024 at 10:02 PM९ पडले
सर मी उदाहरणे सोडवली मला १०पै१० पडले
Anonymous | June 30, 2024 at 8:05 PM