कोणतेही उद्दिष्ट मेहनतीशिवाय पूर्ण होत नाही.
परिमेय संख्या व त्यावरील क्रिया
महत्त्वाचे मुद्दे :
1) परिमेय संख्येचा छेद नेहमी धन पूर्णांक रूपात लिहितात.
उदा. 5/-3 = - 5/3
2) कोणत्याही दोन परिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार परिमेय संख्याच येतो.
3) दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात.
4) संख्यारेषेवरील कोणतीही उजवीकडील परिमेय संख्या ही डावीकडील परिमेय संख्येपेक्षा मोठी असते.
5) दोन समान छेद असलेल्या परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना ज्या परिमेय संख्यांचा अंश मोठा असेल ती परिमेय संख्या मोठी असते.
उदा. 3/11 < 8/11......3 < 8
उदा. - 5/7 > - 6/7....... - 5 > - 6
परीक्षेसाठी उदाहरणे :
1) पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? (2017)
1) - 2/3 > - 1/2 2) - 2/3 > 1/2
3) - 5/4 < - 2/3 4) 5/4 < - 2/3
उत्तर : (3)
1) - 2/3 > - 1/2 छेद समान करू
- 4/6 > - 3/6 ......चूक कारण - 4 < - 3
2) - 2/3 > 1/2 छेद समान करू
- 4/6 > 3/6 ......चूक कारण - 4 < 3
3) - 5/4 < - 2/3 छेद समान करू
- 15/12 < - 8/12 ......अचूक कारण - 15 < - 8
4) 5/4 < - 2/3 छेद समान करू
15/12 < - 8/12 ......चूक कारण 15 > - 8
2] सरळरूप द्या :(2019)
65/77 ÷ 104/99 × 56/45 - 1
1) 1 2) 0 3) 2/5 4) 2/7
उत्तर : (2)
65/77 ÷ 104/99 × 56/45 - 1
= 65/77 × 99/104 × 56/45 - 1
= 5/7 × 9/ 8 × 56/45 - 1
= 1 - 1
= 0
3] 7/15, 11/20, 2/5, 12/15 या परिमेय संख्यांतील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती? (2019)
1) 3/20 2) 3/10 3) 10/3 4) 20/3
उत्तर : (1)
7/15, 11/20, 2/5, 12/25 या परिमेय संख्यांचा छेद समान करू.
15, 20, 5, 25 चा लसावि = 300
7/15 = 7 × 20 / 15 ×20 = 140/ 300
11/20 = 11 × 15 / 20 ×15 = 165/ 300
2/5 = 2 × 60 / 5 ×60 = 120/ 300
12/25 = 12 × 12 / 25 × 12 = 144/ 300
सर्वात मोठी संख्या = 11/20
फरक = 11/20 - 2/5
= 11/20 - 8/20
= 3/20
4] पुढीलपैकी अचूक विधान कोणते?(2020)
1) 43/40 ही परिमेय संख्या संख्यारेषेवर शून्याच्या डावीकडे येते.
2) - 17/-19 ही परिमेय संख्या संख्यारेषेवर शून्याच्या डावीकडे येते.
3) 27/29 ही परिमेय संख्या संख्यारेषेवर शून्याच्या उजवीकडे येते.
4) - 8/3 आणि 3/7 या संख्या संख्यारेषेवर एकाच बाजूला येतात.
उत्तर : (3)
1) चूक : 43/40 ही परिमेय संख्या संख्यारेषेवर शून्याच्या उजवीकडे येते.
2) चूक : - 17/-19 ही परिमेय संख्या धन आहे.संख्यारेषेवर शून्याच्या उजवीकडे येते.
3) अचूक : 27/29 ही परिमेय संख्या धन आहे.संख्यारेषेवर शून्याच्या उजवीकडे येते.
4) चूक : - 8/3 ही परिमेय संख्या संख्यारेषेवर शून्याच्या डावीकडे येते. आणि 3/7 ही संख्या संख्यारेषेवर शून्याच्या उजवीकडे येते.
5] ( - 210 / 8 ) ÷ - [( - 21/ 16) ] = ?
1) - 40 2) 25 3) 20 4) - 20
उत्तर :(4)
( - 210 / 8 ) ÷ - [( - 21/ 16) ]
= ( - 210 / 8 ) ÷ (21/ 16 )
= - 210 / 8 × 16/21
= - 105 / 4 × 16/21
= - 5 × 4
= - 20
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद
तुमची टिप्पणी एंटर करा.नंतर प्रकाशित करा.
👇
उत्तम
जयसिंग पाटील | May 6, 2021 at 8:17 AMउत्तम
जयसिंग पाटील | June 28, 2021 at 10:46 AMGood
Anonymous | July 30, 2022 at 7:47 PM