कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.
शेकडेवारी / शतमान ( Percentage )
शेकडेवारी / शतमान ( Percentage ) :
जेव्हा एखाद्या संख्येची 100 शी भागाकाराने तुलना केली जाते तेव्हा त्यास शेकडेवारी /शतमान म्हणतात.
शेकडेवारीलाच शतमान, प्रतिशेकडा, टक्के, %
या नावाने ओळखले जाते.
1. शतमान : छेद 100 असलेला अपूर्णांक.
2. एखाद्या संख्येच्या छेदस्थानी 100 असते, तेव्हा ती संख्या टक्केवारीत लिहितात.
x /100 म्हणजे x %
x % म्हणजे x /100
उदा. 5 % = 5 / 100
3. अपूर्णांकाचे शतमानात रूपांतर करणे :
1)दिलेल्याअपूर्णांकाला 100 ने गुणले
म्हणजे शतमानात रूपांतर होते.
उदा. 1/2 ............ (1/2 × 100)
= 50 %
2) दिलेल्याअपूर्णांकाचे शतमानात रूपांतर करताना अंश व छेद यांना समान संख्येने गुणावे किंवा भागावे.
उदा. 1) 1/4 = 1× 25/ 4×25
= 25/100
= 25%
2) 8/200 = 8 ÷ 2 / 200 ÷ 2
= 4 / 100
= 4 %
4. शतमानाचे अपूर्णांकात रूपांतर करणे.
1) दिलेल्या शतमानाला 100 ने भागून संक्षेप दिल्यास त्याचे अपूर्णांकात रूपांतर होते.
उदा. 75% ............ (75 /100)
= 3 / 4
2) दिलेल्या शतमानाचे अपूर्णांकात रूपांतर करताना अंश व छेद यांना समानसंख्येने भागावे.
उदा. 40% = 40/100
= 40÷ 20 / 100÷ 20
= 2 / 5
5. a चे b % = a × b / 100
उदा. 200 चे 10 % = 200 × 10 /100
= 2 × 10
= 20
6. नफा, तोटा, वाढ, घट, सूट, कमिशन, रिबेट, दलाली, व्याजाचा दर इत्यादी बाबी शेकडेवारीत सांगतात.
उदा. 15 % नफा असेल तर याचा अर्थ
100 रुपयांवर रु.15 नफा.
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] 5300 चे m % = 159 तर m = ?
1) 30% 2) 3% 3) 300% 4)33%
उत्तर : (2)
5300 चे m % = 159
5300 × m % = 159
5300 × m/100 = 159
5300 चे पक्षांतर करू
m/100 = 159 / 5300
100 चे पक्षांतर करू
m = 159 /5300 × 100
m = 159 /53......अंशाला व छेदाला 100 ने भागून
m = 3
2] 1730 चे 7.5% किती? दोन अचूक पर्याय निवडा. (2017)
1) 129.75 2) 12975 × 10-²
3) 12975 × 10-³ 4) 12.975
उत्तर : (1) व (2)
1730 चे 7.5%
= 1730 × 7.5 / 100
= 1730 × 75 / 1000..... अंशाला व छेदाला 10 ने गुणून
= 1730 × 3 / 40......अंशाला व छेदाला 25 ने भागून
= 173 × 3 / 4......अंशाला व छेदाला 10 ने भागून
= 519 / 4
= 129.75..... पर्याय 1
= 12975/100..... अंशाला व छेदाला 100 ने गुणून
= 12975/10²
= 12975 × 10-²........पर्याय 2
3] 4560 चे 2.7% किती? दोन अचूक पर्याय निवडा. (2020)
1) 12312 × 10-² 2) 123.12
3) 12.312 4) 12312 ×10-³
उत्तर : (1) व (2)
4560 चे 2.7 %
= 4560 × 2.7 / 100
= 4560 × 27 / 1000..... अंशाला व छेदाला 10 ने गुणून
= 456 × 27 / 100......अंशाला व छेदाला 10 ने भागून
= 12312 / 100
= 123.12 .... पर्याय 2
= 12312 / 100
= 12312 / 10²
= 12312 × 10-² ......... पर्याय 1
4] 3/ 6¹/⁴ (6पूर्णांक 1/4)या अपूर्णांकाचे रूपांतर शतमानात पुढील पर्यायांतून निवडा. (2018)
1) 18 % 2) 4) 66 %
उत्तर : (2)
3 / 6¹/⁴......…… (6पूर्णांक 1/4)
= 3 / 25/4
= 3 × 4/25
= 12 / 25
= 48 / 100......... अंशाला व छेदाला 4 ने गुणून
= 48 %
5] एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येच्या 25 % समान आहे. तर हे विधान पुढीलपैकी कोणत्या पर्यायात आहे? (2018)
1) 3y=2x 2) 6x =4y
3) 4x =5y 4) 2x =3y
उत्तर :(3)
एक संख्या x व दुसरी संख्या y मानू.
x × 20 % = y × 25 %
x × 20 /100 = y × 25 /100
x × 1 / 5 = y × 1 / 4
x / 5 = y / 4
4 x = 5 y
6] एका पुस्तकाची किंमत 225 रु. होती. भाव वाढीमुळे किंमत्तीमध्ये 5% वाढ झाली तर पुस्तकाची नवीन किंमत किती?
1) 235.25 2) 236.25
3) 237.25 4) 226.25
उत्तर :(2)
समजा पुस्तकाची मूळ किंमत रु.100 आहे.
किंमत्तीमध्ये 5% वाढ झाली,
पुस्तकाची नवीन किंमत रु 105.
नवीन किंमत / मूळ किंमत गुणोत्तराचा उपयोग करू
x / 225 = 105 / 100
x = 105 / 100 × 225
x = 105 / 4 × 9......अंशाला व छेदाला 25 ने भागून
x = 945 / 4
x = 236.25
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद
तुमची टिप्पणी एंटर करा.नंतर प्रकाशित करा.
👇



Chan
Rahul Mane kolhapur | May 15, 2021 at 7:51 AMउत्तम नियोजन केले आहे हार्दिक अभिनंदन
Rahul Mane kolhapur | May 15, 2021 at 7:52 AMउत्तम
जयसिंग पाटील | July 30, 2021 at 3:50 PMYes
Anonymous | May 14, 2022 at 12:06 PM