दोन ऋण संख्यांचा गुणाकार (Multiplication of two negative numbers) :
गणितातील ऋण (Negative) संख्यांचा अभ्यास करताना अनेकांना गोंधळ वाटतो. विशेषतः दोन ऋण पूर्णांक संख्यांचा गुणाकार करताना उत्तर धन का येते, हे समजून घेणे महत्त्वाचे असते. या लेखात आपण हे सोप्या उदाहरणांसह शिकूया आणि या संकल्पनेचा आत्मविश्वासाने अभ्यास करूया!
गणित शिकण्यासाठी व आपला गणित विषय चांगला होण्यासाठी गणितातील अनेक छोटी छोटी कौशल्य आपल्याला आली पाहिजेत. आज असेच एका महत्त्वाच्या छोट्या कौशल्याचा अभ्यास करूया. उदाहरणे सोडविताना चिन्हाकित संख्यांचा गुणाकार करावा लागतो.
दोन ऋण संख्यांचा गुणाकार ( चिन्हे समान) करण्याचे कौशल्य नसल्यास गुणाकार चुकतो. उत्तर चुकते.परिणामी आपले गुण जातात. यासाठी गुणाकाराचा सराव करा. ऑनलाईन टेस्ट च्या माध्यमातून आपल्या गुणाकार कौशल्याच्या बाबतीत पडताळा घ्या.
दोन ऋण संख्यांचा गुणाकार :
(-) × (-) = +
a व b ऋण संख्या असतील तर
a × b = a b ( a< 0, b <0, ab >0 )
दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो.
किंवा
चिन्हे समान असल्यास गुणाकार धन असतो.
उदा. (-7 )× (-5) = 35
गणितातील ऋण (Negative) संख्यांचा अभ्यास करताना अनेकांना गोंधळ वाटतो. विशेषतः दोन ऋण पूर्णांक संख्यांचा गुणाकार करताना उत्तर धन का येते, हे समजून घेणे महत्त्वाचे असते. या लेखात आपण हे सोप्या उदाहरणांसह शिकूया आणि या संकल्पनेचा आत्मविश्वासाने अभ्यास करूया!
-------------------------------------------------
गुणाकार | उत्तर
-------------------------------------------------
(-3) × (+2) | –6 🔻
(-3) × (+1) | –3 🔻
(-3) × ( 0 ) | 0 ⚫
(-3) × (–1) | +3 🔺
(-3) × (–2) | +6 🔺
क्रमाक्रमाने बघा:
👀
👉 जसे उजवीकडील संख्येत 1 ने घट होते, उत्तर 3 ने वाढते.
👉 0 नंतर उलट धन संख्या येतात.
-------------------------------------------------
वास्तविक जीवनातील उदाहरण (Contextual Example) घेऊन,
दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो,तो कसा धन येतो हे पुढील प्रमाणे पटवून देता येईल.
जर विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनाशी जोडून सांगायचेअसेल तर पुढील उदाहरण अभ्यासा.
"रोज 3 रुपये गमावणे" हे ऋण होईल आणि ते
- 3 होईल.
जर तुम्ही असे 2 दिवस गमावले, तर:
(-3) × 2 = –6
म्हणजे ऋण 6 होईल.
पण जर मागील नुकसानीचे उलट (म्हणजे गमावणे 2 दिवस रद्द करणे).
(–2 दिवस) केले तर नुकसान उलट होईल म्हणजे फायदा होईल.
धन 6 होईल.
(-3) × (–2) = +6
खालील चाचणी सोडवा
आपल्याला दोन ऋण संख्यांचा गुणाकार करण्याच्या उदाहरणांचा सराव होण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. लिंक वर क्लिक करा. त्यामध्ये उदाहरणे दिलेली आहेत.
उदाहरणे सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करावा.
1) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.
3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit होईल .
4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे .
4) त्यानंतर आपले किती प्रश्न (question ) बरोबर सोडवले आहेत ते समजेल व चुकलेल्या प्रश्नाच्या ( questions ) उत्तराचे स्पष्टीकरण (explanation) Feedback मध्ये आपल्याला सादर होईल.
5) उदाहरणाचे उत्तर कोणता पर्याय येईल त्या पर्यायावर click करावे .
पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा questions स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
खालील लिंक क्लिक करा.
👇
चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी ) एंटर करा व प्रकाशित करा
👇
कृपया खाली कॉमेंट करून सांगा की तुम्ही गणिताचा अभ्यास कसा करता!
✍️ आणि हा लेख उपयुक्त वाटला तर जरूर शेअर करा.
लेखक: Ganit Expert Hovuya
श्री.जे.एम.पाटील
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:8329467192
📱 WhatsApp: 9405559874
📌 स्पर्धा परीक्षांसाठी गणित मार्गदर्शन
अजून अशाच उपयुक्त माहितीकरिता भेट द्या
https://ganitexperthovuya.blogspot.com


उत्तम
जयसिंग पाटील | June 16, 2021 at 10:08 PMउत्तम
जयसिंग पाटील | July 22, 2021 at 10:35 AM