Translate

Thursday, July 22, 2021

स्कॉलरशिप परीक्षा 92: संख्याज्ञान - स्पर्धा परीक्षा (Study of Numbers for Competitive)

 



संख्याज्ञान

            संख्याज्ञान|Study Of Numbers-sankhyaagyaan|हा गणितातील घटक स्कॉलरशिप व इतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्तवाचा आहे.


                एक अंकी, दोन अंकी व तीन अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या, सम संख्या, विषम संख्या, मूळसंख्या व संयुक्त संख्या यासंबंधी माहिती असणे आवश्यक आहे.

स्कॉलरशिप परीक्षेत 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, सम संख्यांची बेरीज , विषम संख्यांची बेरीज, मूळ संख्यांची बेरीज, संयुक्त संख्यांची बेरीज यासंबंधी प्रश्न विचारले जातात.


संख्याज्ञानमध्ये 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या, सम संख्या, विषम संख्या, मूळसंख्या व संयुक्त संख्या यासंबंधी माहिती घेऊ. संख्यांचा अधिक अभ्यास करण्यासाठी

meganitexpert. blogspot. com वर संख्यांचे प्रकार,नैसर्गिक संख्या,वास्तव संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सम व विषम संख्या सर्च करा.


संख्याज्ञान सारणी :


सारणीमध्ये 1 ते 100 मध्ये पुढील प्रकारच्या संख्या आहेत.

1) नैसर्गिक संख्या (Natural Numbers): 1,2,3,4,5,6,...,100.

 1 पासून 100 पर्यंत नैसर्गिक संख्या =100

 1 पासून 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज = 5050


2) विषम संख्या (Odd Numbers): 1,3,5,7,...,99. 

1 पासून 100 पर्यंत विषम संख्या = 50

 1 पासून 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज =  2500


3) सम संख्या (Even Numbers): 2,4,6,8,...,100.


1 पासून 100 पर्यंत सम संख्या = 50

 1 पासून 100 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज = 2550

4) मूळसंख्या (Prime Numbers ): 2,3,5,7,11,13,...,97.


1 पासून 100 पर्यंत मूळ संख्या =  25

 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज = 1060

5) संयुक्त संख्या  (Compound Numbers) : 4,6,8,9,10,...,100


1 पासून 100 पर्यंत संयुक्त संख्या = 74

 1 पासून 100 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज = 3990






परीक्षेसाठी उदाहरणे :

1] दोन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व लहानात लहान मूळ संख्या यांच्यातील फरक किती?

1)  82          2) 86           3) 80     4) 95


उत्तर : (2)

दोन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या = 97


दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या =11
 
फरक = 97 - 11 = 86


2] 11 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 400 पेक्षा कितीने कमी आहे?

1) 89       2) 87        3) 79          4) 97


उत्तर : (1)

11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज = 60

21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज = 52
       
31 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज = 68

41 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज = 131 

11 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज = 60 + 52 + 68 + 131 = 311

फरक = 400 - 311 =  89


3] 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज ही 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे?

1) 4990      2) 3390       3) 3990       4) 4490


उत्तर : (3)

 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज = 5050 

 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज = 1060

फरक = 5050 - 1060 =  3990


4] लहानात लहान एक अंकी मूळ संख्या व मोठ्यात मोठी दोन अंकी सम संख्या यांचा गुणाकार कोणत्या संख्येचा वर्ग आहे.?

1) 13        2)  12        3)  13       4) 14


उत्तर : (4)

लहानात लहान एक अंकी मूळ संख्या = 2

मोठ्यात मोठी दोन अंकी सम संख्या = 98

गुणाकार = 2 × 98 = 196 = (14)²

5] 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्यांची संख्या ही 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे?


1) 99          2) 49            3) 39          4) 50


उत्तर : (2)


1 ते 100 पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्यांची संख्या = 74

 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांच्या संख्या = 25

फरक = 74 - 25 = 49




•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

                                                धन्यवाद 



तुमची टिप्पणी एंटर करा.नंतर प्रकाशित करा.

                        👇














Post a Comment

0 Comments:

Post a Comment

0 Comments:

Post a Comment