Translate

Monday, August 23, 2021

NMMS SCHOLARSHIP EXAM 93:परिमेय व अपरिमेय संख्या(Rational and Irrational Numbers ):सराव चाचणी




           परिमेय व अपरिमेय संख्या

(Rational and Irrational Numbers)


परिमेय व अपरिमेय संख्या |Rational and Irrational Numbers |primey v aprimey snkhya |या प्रकरणाचा समजून घेऊन अभ्यास करा.

meganitexpert.blogspot.com या Blog URL वर परिमेय व अपरिमेय संख्या या भागाचा अभ्यास करा.

परिमेय व अपरिमेय संख्या या प्रकरणावरील पुढील प्रश्न सोडवा व आपला अभ्यास पडताळून पहा.


1] पुढील पैकी कोणती संख्या परिमेय नाही?


1) 7       2) -12    3)  0/5        4) 9/0


2]  संख्या रेषेवरील - 4/5 या संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे.?


1)  शून्याच्या डावीकडील प्रत्येक एककाचे 4  समान भाग केलेले असतात.

2) शून्यापासून डावीकडील चौथा बिंदू -4/5 ही संख्या दाखवतो

3) शून्यापासून डावी कडील पाचवा बिंदू -4/5 ही संख्या दाखवतो

4) शून्यापासून उजवीकडील पाचवा बिंदू -4/5 ही संख्या दाखवतो


3] पुढीलपैकी असत्य विधान कोणते?


1) दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य संख्या असतात.

2) 1 ही परिमेय संख्या पूर्णांक आहे.

3) संख्यारेषेवर डावीकडील संख्या उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा लहान असते .

4) a/b  = ak/bk, ( k= 0)


4] पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती?


1)     0 > - 1

2)    - 4 < -5

3) जर  a< b, तर -a> - b

4) जर a× d < b× c तर  a/b < c/d


5] पुढीलपैकी योग्य जोडी कोणती?


1) 5/6 > 7/8

2) -7/3 > - 5/2

3) 11/3 =  14/6

4) 17/ 18 < 0


6] पुढीलपैकी असत्य विधान कोणते?

1) प्रत्येक परिमेय संख्या अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येते.

2) 22/7 या संख्येचे दशांश रूप खंडित दशांश रूप येते.

3) 15.4 = 15.40

4) अपरिमेय संख्येचे दशांश रूप  अखंड आवर्ती नसते 

7] पुढीलपैकी कोणती संख्या परिमेय नाही?

1) 3.14

2) √361

3) √8

4) 0.6


8] पुढीलपैकी सत्य विधान कोणते?


1) सर्व परिमेय संख्या वास्तव संख्या असतात .

2) सर्व अपरिमेय संख्या वास्तव संख्या नाहीत .

3) प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय संख्या संख्या असतेच.

4) प्रत्येक वास्तव संख्या ही अपरिमेय संख्या असते.


9] खालील पर्यायांपैकी चुकीची जोडी कोणती?


1) नैसर्गिक संख्या समूह - सर्व धन पूर्णांक संख्या

2) पूर्ण संख्या समूह - शून्य व सर्व धन पूर्णांक संख्या

3) पूर्णांक संख्या समूह - सर्व धन व ऋण पूर्णांक संख्या

4) परिमेय संख्या - अपरिमेय नसलेल्या संख्या

 

10] खालीलपैकी परिमेय संख्या कोणती?


1) 22/7

2) √5

3) 1.3030030003...

4) π


उत्तरे :

1) 4       

2)  2

3) 4

4) 2

5) 2

6) 2

7) 3

8) 1

9) 3

10) 1


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••






Post a Comment

1 Comments:

This comment has been removed by the author.

Gandhali Anant Keluskar | August 29, 2021 at 2:50 PM

Post a Comment

1 comment: