विद्या अमर्याद आहे. म्हणून आपण जन्मभर विद्यार्थी राहिले पाहिजे.
संख्यारेषा (Number Lines)
संख्यारेषा |Number Lines ||sankhyaresha|ही गणितातील एक महत्वाची प्राथमिक संकल्पनाआहे.गणित म्हणजे संख्या व चिन्हे यांचा खेळ असे म्हणतात.वास्तव संख्यांचाअभ्यास करण्यासाठी संख्यारेषेचा (NumbeLines)उपयोग केला जातो.संख्या रेषेवर आरंभ बिंदू घेतला जातो.संख्या रेषेवर डावीकडे ऋण संख्या व उजवीकडे धन संख्या दाखवितात.सर्व परिमेय संख्या व अपरिमेय संख्या वास्तव संख्या रेषेवर असतात.बिंदू व बिंदूचे निर्देशक,दोनबिंदूतील अंतर,समीकरणांचे आलेख यांचा अभ्यास करण्यासाठी संख्यारेषा (Number Lines|snkhyresha) वापरतात.
संख्यारेषा :
1) संख्यारेषेवरील 0 (शून्य) ही संख्या आरंभबिंदू O या अक्षराने दर्शवतात.
2) आरंभबिंदूच्या उजवीकडील संख्या धन असतात व डावीकडील संख्या ऋण असतात.
3) संख्यारेषेवरील बिंदूशी निगडित असलेल्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक म्हणतात.
उदा. बिंदू M चा निर्देशक 2 आहे.
4) संख्यारेषेवरील शून्य निर्देशक दर्शविणाऱ्या बिंदूला आरंभबिंदू 'O' म्हणतात.
4) संख्यारेषेवरील विशिष्ट संख्या दर्शविणाऱ्या बिंदूला त्या संख्येचा आलेख म्हणतात.
उदा. 3 या निर्देशकाचा आलेख बिंदू N.
5) संख्यारेषेवर सर्व परिमेय संख्या दर्शविता येतात.
समान छेद असणाऱ्या परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखविणे.
पद्धती :
• 0 ते 1 या एककाचे (इतर एकककांचेही ) छेदा तील संख्येइतके समान भाग करा.
• अंशातील संख्येइतके एकूण आरंभबिंदूपासून भाग घ्या.
उदा. 1/3, 2/3, 3/3= 1, 4/3, - 2/3,-5/3
प्रत्येक एककाचे समान 3 भाग करून
2/3 दर्शवताना 2 भाग,
4/3 दर्शवताना 4 भाग, घेऊन संख्या दर्शवतात.
M बिंदूच्या डावीकडे असल्यास T बिंदूचा निर्देशक कोणता ?
1) 18/3 2) -18/3 3) -8/3 4) 8/3
उत्तर : (2)
जर बिंदू T हा बिंदू M च्या डावीकडे असेल
तर T बिंदूचा निर्देशक M बिंदूच्या निर्देशकापेक्षा लहान असणार.
लहान निर्देशक = मोठा निर्देशक - अंतर
= - 5/3 - 13/3
= - 18/3
3] संख्यारेषेवर M बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. M व N बिंदूतील अंतर 3 एकक असेल, तर N बिंदूचे निर्देशक कोणते असू शकतील? (2017)
1) -7/3 2) 11/3 3) 5/3 4) - 1/3
उत्तर : (1) व (2)
जर N बिंदूचा निर्देशक मोठा असेल (उजवीकडे असेल) तर
जर N बिंदूचा निर्देशक लहान असेल (डावीकडे असेल) तर
लहान निर्देशक = मोठा निर्देशक - अंतर
= 2/3 - 3
= - 7/3
1) 13/7 2) 5/7 3) -13/7 4) - 5/7
उत्तर : (1) व (4)
जर Q बिंदूचा निर्देशक मोठा असेल (उजवीकडे असेल) तर
जर Q बिंदूचा निर्देशक लहान असेल (डावीकडे असेल) तर
लहान निर्देशक = मोठा निर्देशक - अंतर
= 4/7 - 9/7
= - 5/3
5] संख्यारेषेवर P बिंदूचा निर्देशक -5/9 आहे. P व Q बिंदूतील अंतर 4 एकक असेल, तर Q चा निर्देशक किती ? ( दोन अचूक पर्याय निवडा ) (2020)
1) - 4 पूर्णांक 5/9 2) 3 पूर्णांक 4/9
3) 4 पूर्णांक 5/9 4) - 1/9
उत्तर : (1) व (2)
जर Q बिंदूचा निर्देशक मोठा असेल (उजवीकडे असेल) तर
= 3 पूर्णांक 4/9
जर Q बिंदूचा निर्देशक लहान असेल (डावीकडे असेल) तर
लहान निर्देशक = मोठा निर्देशक - अंतर
= -5/9 - 4
= - 41/9




Nice sir...
Ajay Patil | May 4, 2021 at 8:43 AMउत्तम
जयसिंग पाटील | July 14, 2021 at 8:08 AMखूपच छान सर
Lakade Sir | January 14, 2022 at 8:27 AM