Translate

Wednesday, December 30, 2020

NMMS-SCHOLARSHIP-EXAM MATHS :33 समांतर रेषा व छेदिका ( Parallel lines and Transversal ):1

 

यशाजवळ पोहचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

 




समांतर  रेषा व  छेदिका 

( Parallel  lines and Transversal )


समांतर  रेषा व  छेदिका |Parallel  lines and Transversal |smantr resha v chedika|या घटकांमध्ये समांतर रेषा (समान अंतर असलेल्या रेषा ), छेदि का यांच्या व्याख्या, छेदिकेमुळे होणारे कोन, संगत कोन,व्युत्क्रम कोन, आंतरकोन याविषयी माहिती घेऊ.



महत्त्वाचे  मुद्दे :


1) समांतर  रेषा ( Parallel  lines ):

एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर  रेषा म्हणतात. 

रेषा l व रेषा m  एकमेकींना समांतर असतील तर हे 'रेषा l || रेषा m असे लिहितात.

2) छेदिका ( Transversal ) :

जर एखादी रेषा दिलेल्या दोन किंवा अधिक रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल, तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणतात. 


3) छेदिकेमुळे  होणारे कोन ( Angles made by  transversal ):



एखादी छेदिका जेव्हा दोन रेषांना भिन्न बिंदूत छेदते तेव्हा प्रत्येक छेदन बिंदूजवळ 4 असे एकूण 8 कोन तयार होतात. 


संगत कोन ( Corresponding angles ):


ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी संगत कोनांची असते. 


संगत  कोनांच्या 4 जोड्या :

1) ∠p व ∠ w 


2) ∠ q  व  ∠ x 


3) ∠r  व ∠ y 


4) ∠ s व ∠ z 


व्युत्क्रम कोन (Alternate angles) :


ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा  विरुद्ध  दिशा दर्शवतात, ती जोडी  व्युत्क्रम कोनांची असते. 

 

व्युत्क्रम  कोनांच्या 4 जोड्या :


आंतर व्युत्क्रम  कोनांच्या 2 जोड्या :

1)  ∠ s व ∠ x         2)  ∠r  व ∠ w


बाह्य व्युत्क्रम  कोनांच्या 2 जोड्या :

 1) ∠p व ∠ y           2)  ∠ q  व  ∠ z


आंतर कोन (Interior angles) :

ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस असतात व छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी आंतर कोनांची असते. 


आंतर  कोनांच्या 2 जोड्या :

1)  ∠ s व ∠ w          2)  ∠r  व ∠ x


परीक्षेसाठी प्रश्न :


1] दोन  रेषांना एका  छेदिकेने छेदले असता संगतकोनांच्या किती जोड्या तयार होतात ? 


1) 8          2) 4            3 )   2          4 ) 1


उत्तर :  ( 2 )


2] खालील आकृतीमधील छेदिकांची एकूण  संख्या  किती? 

1)  2          2)  1           3)  3           4)   0




उत्तर :  ( 2 )


 3] एखादी छेदिका जेव्हा दोन रेषांना भिन्न बिंदूत छेदते तेव्हा प्रत्येक  छेदन बिंदू जवळ x  असे एकूण y कोन तयार होतात. तर x व y च्या किंमती कोणत्या? 

1) x  = 8,  y = 4            2)   x  = 4,  y = 4


3) x  = 4,  y = 8            4)   x  = 2,  y = 4


उत्तर :  ( 3 )


एखादी छेदिका जेव्हा दोन रेषांना भिन्न बिंदूत छेदते तेव्हा प्रत्येक छेदन बिंदूजवळ 4 असे एकूण 8 कोन तयार होतात. 



4] दोन  रेषांना एका छेदिकेने छेदले असता आंतर कोनांच्या किती जोड्या तयार होतात ? 

1)  4          2)  1           3)  8         4)  2


उत्तर :  ( 4 )


5] समांतर रेषा...................  .  


1) एकाच प्रतलात असतात. 


2) एकाच प्रतलात नसतात. 


3) एकमेकींना छेदणाऱ्या असतात. 


4)एकमेकींना छेदणाऱ्या नसतात. 


उत्तर :  ( 1 ) व  ( 4 )



••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

                                                                                                               धन्यवाद 



Post a Comment

3 Comments:

Good learning

Unknown | December 31, 2020 at 1:04 PM

उत्तम

जयसिंग पाटील | June 25, 2021 at 10:39 AM

Nunexgil_beStamford Marisol Soler https://marketplace.visualstudio.com/items?itemName=listipte-me.Descargar-Triuna-gratuita
beltygeve

Nunexgil_beStamford | April 23, 2022 at 4:06 PM

Post a Comment

3 comments: