सूट व कमिशन
(Discount and Commission)
इयत्ता आठवी गणित प्रकरण 9 मध्ये सूट व कमिशन |Discount and Commission |sut v Commission |चा अभ्यास आहे. NMMS परीक्षेत एक प्रश्न नेहमी असतो.सदर पोस्ट मध्ये छापील किंमत,विक्री किंमत सूट (Discount), शे.सूट, सूत्रे व उदाहरणे या बद्दल माहिती घेऊ .
महत्त्वाचे मुद्दे :
छापील किंमत (Marked Price):
विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते, तिला त्या वस्तूची छापील किंमत म्हणतात.
सूट (Discount):
वस्तू विकताना, दुकानदार छापील किंमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्या रकमेला सूट म्हणतात.
सूट = छापील किंमत - विक्री किंमत
सुटीचा दर सामान्यपणे शतमानात म्हणजेच शेकडेवारीत देण्यात येतो.
शे. x सूट = x% सूट
उदाहरणार्थ : शेकडा 10 सूट किंवा 10% सूट
शे. x सूट किंवा x% सूट असेल तर
x/100 = वस्तूच्या किंमतीवरील सूट /छापील किंमत
(x/100) × छापील किंमत = वस्तूच्या किंमतीवरील सूट
वस्तूच्या किंमतीवरील सूट = (x/100) × छापील किंमत
सूट = छापील किंमत × x /100
सूट = छापील किंमत × शेकडा सूट
सुटीची टक्केवारी (x)= (सूट/छापील किंमत ) × 100
विक्री किंमत (Selling Price):
छापील किंमतीवर सूट देऊन उरलेल्या किंमतीला विक्री किंमत म्हणतात.
विक्री किंमत = छापील किंमत - सूट
सूट = छापील किंमत - विक्री किंमत
छापील किंमत = विक्री किंमत + सूट
x% सूट , रु 100 छापील किंमत असताना विक्री किंमत = 100 - x
पुढील गुणोत्तरे लक्षात ठेवा :
सूट /छापील किंमत - या गुणोत्तराशी संबधी :
सुटीची टक्केवारी /100 = प्रत्यक्ष मिळालेली सूट /छापील किंमत
प्रत्यक्ष विक्री किंमत / छापील किंमत - या गुणोत्तराशी संबधी :
(100 - सुटीची टक्केवारी ) /100 = प्रत्यक्ष विक्री किंमत / छापील किंमत
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] छापील किंमतीवर 13% सूट देऊन एक वस्तू 1392 रुपयास एका दुकानदाराने गिऱ्हाईकास विकली तर त्या वस्तूची छापील किंमत किती? (2018-19)
1)1400 रु. 2)1500 रु . 3)1550 रु . 4)1600 रु
उत्तर : (4)
विक्री किंमत / छापील किंमत................ या गुणोत्तराचा उपयोग करू.
(100 - सुटीची टक्केवारी ) /100 = प्रत्यक्ष विक्री किंमत / छापील किंमत
किंमती ठेवू
(100 - 13) /100 = 1392 / छापील किंमत
87 /100 = 1392 / छापील किंमत
87 × छापील किंमत = 1392 × 100
छापील किंमत = 1392 × 100 / 87
छापील किंमत = 16 × 100.......... 87 ने अंशाला व छेदाला भागून
छापील किंमत = 1600 रु.
2] एका दुकानदाराने एक वस्तू 920 रुपयास विकल्यामुळे गिऱ्हाईकास शेकडा 8 सूट मिळाली, तर त्या वस्तूची छापील किंमत किती? (2014-15)
1)1000 रु. 2)1050 रु . 3)1200 रु . 4)1150 रु
उत्तर : (1)
विक्री किंमत / छापील किंमत................ या गुणोत्तराचा उपयोग करू.
(100 - सुटीची टक्केवारी ) /100 = प्रत्यक्ष विक्री किंमत / छापील किंमत
किंमती ठेवू
(100 - 8) /100 = 920/ छापील किंमत
92 / 100 = 920 / छापील किंमत
92 × छापील किंमत = 920 × 100
छापील किंमत = 920 × 100 /92
छापील किंमत = 10 × 100.......... अंशाला व छेदाला 92 ने भागून
छापील किंमत = 1000 रु.
3] दुकानदार एका वस्तूवर शे. 8 सूट देऊन वस्तू रु. 414 ला विकतो, तर त्या वस्तूची छापील किंमत किती? (2015-16)
1) रु. 650 2) रु. 450 3) रु. 550 4) रु.600
उत्तर : (2)
विक्री किंमत / छापील किंमत................ या गुणोत्तराचा उपयोग करू.
(100 - सुटीची टक्केवारी ) /100 = प्रत्यक्ष विक्री किंमत / छापील किंमत
किंमती ठेवू
(100 - 8) /100 = 414 / छापील किंमत
92 / 100 = 414 / छापील किंमत
92 × छापील किंमत = 414 × 100
छापील किंमत = 414 × 100 /92
छापील किंमत = 414 × 25 × 4 / 23 × 4
छापील किंमत = 18× 25 .............अंशाला व छेदाला 23 व 4 ने भागून
छापील किंमत = 450 रु.
4] एका व्यापाऱ्याने गिऱ्हाईकास 3560 रुपये छापील किंमतीचे कापड विकले. त्याने गिऱ्हाईकाला 15% सूट दिली तर गिऱ्हाईकाला सूट किती मिळाली?
1) रु. 543 2) रु. 534 3) रु. 535 4) रु.345
उत्तर :(2)
सूट = छापील किंमत × शेकडा सूट
सूट = छापील किंमत × x /100
सूट = 3560 × 15 /100
सूट = 3560 × 0.15 ...... अंशाला व छेदाला 100 ने भागून
सूट = 534.00 रु.
5] एका टेबलची छापील किंमत 3000 रु. आहे. दुकानदाराने 360 रु. सूट दिली तर टेबलची विक्री किंमत किती? त्याने शेकडा सूट किती दिली?
1)अनुक्रमे 2260 रु. व शे. 10
2)अनुक्रमे 3360 रु. व शे. 14
3)अनुक्रमे 3660 रु. व शे. 15
4)अनुक्रमे 2640 रु. व शे. 12
उत्तर :(4)
विक्री किंमत = छापील किंमत - सूट
विक्री किंमत = 3000 - 360
विक्री किंमत = 2640 रु.
वस्तूची छापील किंमत 100 रु. तेव्हा सूट x मानू.
सूट / छापील किंमत................ या गुणोत्तराचा उपयोग करू.
सुटीची टक्केवारी /100 = प्रत्यक्ष मिळालेली सूट /छापील किंमत
x/100 = 360 /3000
x = ( 360 /3000) × 100
x = 360 /30 ...... अंशाला व छेदाला 100 ने भागून
x = 12
शेकडा सूट = 12
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आजचा प्रश्न
17 सप्टेंबर 2014 रोजी कोणती महत्वाची भारतीय शास्त्रीय मोहीम यशस्वी ठरली?
उत्तर 👇
General Knowledge - आजचा प्रश्न
✍️ आणि हा लेख उपयुक्त वाटला तर जरूर शेअर करा.
लेखक: Ganit Expert Hovuya
श्री.जे.एम.पाटील
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:8329467192
📱 WhatsApp: 9405559874
📌 स्पर्धा परीक्षांसाठी गणित मार्गदर्शन
अजून अशाच उपयुक्त माहितीकरिता भेट द्या
https://ganitexperthovuya.blogspot.com
धन्यवाद
Post a Comment