कमिशन (Commission)
इयत्ता आठवी गणित प्रकरण 9 मध्ये सूट व कमिशन |Discount and Commission |sut v Commission |चा अभ्यास आहे. NMMS परीक्षेत एक प्रश्न नेहमी असतो.सदर पोस्ट मध्ये कमिशन /दलाली किंवा अडत , कमिशन एजंट /दलाल/अडत्या, सूत्रे व उदाहरणे या बद्दल माहिती घेऊ .
महत्त्वाचे मुद्दे :
1) उत्पादक व गिऱ्हाईक यांच्यातील मध्यस्थाला दलाल किंवा कमिशन एजंट किंवा अडत्या (शेतीमालाबाबत) म्हणतात.
2) कमिशन एजंटला काम करण्यासाठी जो मोबदला मिळतो, त्याला कमिशन म्हणतात.
दलालाला काम करण्यासाठी जो मोबदला मिळतो, त्याला दलाली म्हणतात.
अडत्याला काम करण्यासाठी जो मोबदला मिळतो, त्याला अडत म्हणतात.
3) कमिशन /दलाली /अडत शेकडेवारीत देण्यात येते.
4) कमिशन हे विक्री किंमतीवर दिले जाते.
कमिशन = विक्री किंमत × शेकडा कमिशन
कमिशनचा शेकडा दर = (कमिशन /विक्री किंमत ) × 100
5) दलाली ही विक्री किंमत व खरेदी किंमतीवर मिळते.
दलाली = विक्री किंमत × शेकडा दलाली
दलाली = खरेदी किंमत × शेकडा दलाली
दलालीचा शेकडा दर = (दलाली /विक्री किंमत ) × 100
दलालीचा शेकडा दर = (दलाली / खरेदी किंमत ) × 100
6) अडत ही विक्री किंमत व खरेदी किंमतीवर मिळते.
अडत = विक्री किंमत × शेकडा अडत
अडत = खरेदी किंमत × शेकडा अडत
अडतीचा शेकडा दर = (अडत / विक्री किंमत ) × 100
अडतीचा शेकडा दर = (अडत / खरेदी किंमत ) × 100
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] अजयने p रु. किंमतीची फळे विकली असता त्याला 12% या दराने एकूण 5100 रु. कमिशन मिळाले. तर p ची किंमत किती? (2013-14)
1) 30, 000 रु. 2) 32, 000 रु.
3) 42, 500 रु. 4) 40, 000 रु.
उत्तर : (3)
कमिशन = विक्री किंमत × शेकडा कमिशन
5100 = p × 12/100
5100 × 100/12 = p......... दोन्ही बाजूंना 100/12 ने गुणून.
425 × 100 = p
42500 = p
P = 42500 रु.
2] संपतरावांनी त्यांचे घर दलालामार्फत विकले. घराची किंमत रु.4,50, 000 ठरली आणि दलाली शे. रु.2 दलाली दयावी लागली. तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले?(2015 -16)
1) 4, 59, 000 रु. 2) 4, 41, 000 रु.
3) 4, 50, 900 रु. 4) 4, 49, 100 रु.
उत्तर : (2)
दलाली = विक्री किंमत × शेकडा दलाली
दलाली = 4,50, 000 × 2/100
दलाली = 4,500 × 2............ अंशाला व छेदाला 100 ने भागून.
दलाली = 9000 रु.
घर विकून मिळालेली रक्कम = घराची विक्री किंमत - दलाली
= 4, 50, 000 - 9000
= 4, 41, 000 रु.
3] रामभाऊंनी आपली जमीन दलालामार्फत गजाभाऊंना 44, 00000 रुपयास विकली. दलालाने दोघांकडून 2% दराने दलाली घेतली, तर दलालास एकूण किती रुपये मिळाले?
1) 1, 67, 000 रु. 2) 1, 67, 00 रु.
3) 1, 77, 000 रु. 4) 1, 76, 000 रु.
उत्तर : (4)
दलाली ही विक्री किंमत व खरेदी किंमतीवर मिळते.
रामभाऊंकडून घेतलेली ,
दलाली = विक्री किंमत × शेकडा दलाली
= 44, 00000 × 2/100
= 44, 000 × 2............ अंशाला व छेदाला 100 ने भागून.
= 88, 000 रु.
गजाभाऊंकडून घेतलेली ,
दलाली = खरेदी किंमत × शेकडा दलाली
= 44, 00000 × 2/100
= 44, 000 × 2............ अंशाला व छेदाला 100 ने भागून.
= 88, 000 रु.
दलालास एकूण मिळणारी दलाली = 88000+88000
= 176000 रु.
4] जॉनने मॅथेमॅटीकसची 9000 रुपये किंमतीची पुस्तके विकली.त्याबद्दल त्याला a % कमिशनने 1350 रुपये मिळाले. तर a =...............
1) 7.5 2) 25 3) 45 4) 15
उत्तर : (4)
कमिशनचा शेकडा दर = (कमिशन /विक्री किंमत ) × 100
a = (1350 / 9000 ) × 100
a = 135000 / 9000
a = 135 / 9........... अंशाला व छेदाला 1000 ने भागून.
a = 15
5] एका शेतकऱ्याने 12000 रुपये किंमतीचा गहू अडत्यामार्फत विकला,त्याला 2.5%अडत दयावी लागली. तर अडत्याला किती रक्कम मिळाली?
1) रु. 300 2) रु. 250 3) रु. 2500 4) रु. 3000
उत्तर : (1)
अडत = विक्री किंमत × शेकडा अडत
= 12000 × 2.5 /100
= 120 × 2.5 ............ अंशाला व छेदाला 100 ने भागून.
अडत = 300.0 रु.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद
Post a Comment