वाचनासाठी वेळ देणे आवश्यक आहे, कारण तो ज्ञानाचा पाया आहे.
गणिताची उदाहरणे सोडवताना अनेक क्रिया कराव्या लागतात. त्यापैकी एक क्रिया म्हणजे संक्षिप्त रूप देणे. संक्षिप्त रूप देणे म्हणजे सममूल्यलिहिणे, सामायिक अवयवाचा (Common Factor) लोप करणे. ही क्रिया करण्यासाठी अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने किंवा अवयवाने भागले जाते. गणितात काही वेळा उदाहरणार्थ छेदाचे परिमेयीकरण करण्यासाठी अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले जाते.अशा क्रिया केल्यानंतर किंमत बदलत नाही. या गणितातील क्रिया समजणे अतिशय महत्वाचे आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
स्वयं अध्ययन भाग : (4)
अध्ययन घटक : सममूल्य अपूर्णांक
सममूल्य अपूर्णांक : समान अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात
उदाहरणार्थ :
1/2 व 10/20, 1/2 = 10/20
3/4 व 21/28, 3/4 = 21/28
महत्त्वाचे मुद्दे :
1)अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणल्यास सममूल्य अपूर्णांक मिळतो.
उदाहरणार्थ :
3/4 = 3×7/4×7 = 21/28
3/4 = 21/28
2) अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने भागल्यास सममूल्य अपूर्णांक मिळतो.म्हणजेच संक्षिप्त रूप मिळते.
उदाहरणार्थ :
35/45 = 35÷5/45÷5 = 7/9
35/45 = 7/9
3) अतिसंक्षिप्त रूप देणे :
पद्धत 1:अंशाच्या व छेदाच्या मसावि ने अंशाला व छेदाला भागणे.
उदाहरणार्थ :
8/20
8 व 20 चा मसावि 4
= ( 8÷4 ) / (20÷4 )
= 2/5
पद्धत 2: सामाईक अवयवांचा लोप करणे.
उदाहरणार्थ :
8/20
= 2×2×2/2×2×5
= 2 /5
स्वाध्याय :
A) सममूल्य अपूर्णांक लिहा.
1) 5/7 2) 1/9 3) 25/40 4) 100/200 5)8/12
B) अतिसंक्षिप्त रूप द्या.
1) 17/34 2) 50/75 3) 110/30 4)21/522 5) 32/8
उत्तरे :
A) (वेगवेगळी असू शकतील )
1) 10/14 2) 2/18 3) 5/8 4)1/2 5) 16/24
B) 1) 1/2 2) 2/3 3) 11/3 4)7/174 5)4/1
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद

Chhan
Unknown | September 14, 2020 at 7:59 PM