परिमिती ( Perimeter )
भूमितीतील | परिमिती | primiti|perimeter |हा एक महत्वाचा घटक आहे. परिमितीची व्याख्या व त्रिकोणाची परिमिती याविषयी माहिती घेऊ.
परिमिती : काही रेषाखंडांनी बंदिस्त असलेल्याआकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय.
• जी आकृती बंदिस्त नाही तिची परिमिती काढता येत नाही.
• कोणत्याही प्रतलीय बंद आकृतीची परिमिती = तिच्या सर्व बाजूंच्या (कडेच्या )लांबीची बेरीज.
• परिमिती काढताना आकृतीच्या बाह्य कडांच्या लांबीचीच बेरीज करावी.
त्रिकोणाची परिमिती : त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज.
वरील त्रिकोणाची परिमिती = 50 + 40 + 35
= 125 मी.
समभुज त्रिकोणाची परिमिती : 3 × बाजूची लांबी
समभुज त्रिकोणाची बाजू = परिमिती ÷ 3
समद्विभुज त्रिकोणाची परिमिती = 2 × समान लांबीची बेरीज + असमान बाजूची लांबी
त्रिकोणाची परिमिती यावरील उदाहरणे सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करा.
1) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा .
2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.
3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit होईल .
4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे .
5) त्यानंतर आपले किती प्रश्न (question ) बरोबर सोडवले आहेत ते समजेल व चुकलेल्या प्रश्नाच्या ( questions ) उत्तराचे स्पष्टीकरण (explanation) Feedback मध्ये आपल्याला सादर होईल.
6) उदाहरणाचे उत्तर कोणता पर्याय येईल त्या पर्यायावर click करावे .
पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा questions स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. .
खालील लिंक वर क्लिक करा.
👇
👇
चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी ) एंटर करा व प्रकाशित करा
Post a Comment