काळ, काम, वेग (Time, Work, Speed )
सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये काळ, काम व वेग या घटकांवर उदाहरण असते.NMMS,NTS व स्कॉलरशिप या शालेय स्तरावरील परीक्षांमध्ये काळ,काम व वेग यावर उदाहरण असतेच . म्हणून काळ, काम व वेग या घटकांवरील सूत्रांचा व उदाहरणांचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
एखादे एकूण काम हे माणसांच्या समप्रमाणात असते.काम जास्त असेल तर माणसे जास्त लागतात व काम कमीअसेल तर माणसे कमी लागतात.
एखादे काम पूर्ण करण्यासाठी लागणारी एकूण माणसे ही वेळेच्या व्यस्त प्रमाणात असतात. माणसे जास्त, वेळ कमी व माणसे कमी असतील तर वेळ जास्त लागतो.
चलनाचा उपयोग करून काळ, काम व वेग या घटकांवरील उदाहरणे सोडविता येतात.
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] बसचा वेग ताशी 48 किमी असताना ढेपेवाडीहून पावडेवाडीस जाण्यासाठी 5 तास लागतात. परंतु 3 तासातच पोहचायचे असल्यास गाडीचा वेग ताशी किती वाढवावा लागेल?
1)18 किमी. 2)28 किमी. 3) 30किमी. 4) 32 किमी.
उत्तर : (4)
गाडीचा वेग ताशी v किमी मानू.
लागणारा वेळ t तास मानू.
वेग व वेळ यात व्यस्त चलन आहे.
वाढवावा लागणारा वेग = 80 - 48 = 32 किमी.
सोपी पद्धत :
व्यस्त चलनात गुणाकार स्थिर असतो.
v1 × t1 = v2 × t2
v1 = 48, t1 = 5 , t2 = 3 ठेवू..
48 × 5 = v2 × 3
240 = v2 × 3
240/3 = v2
80 = v2
v2 = 80
वाढवावा लागणारा वेग = 80 - 48 = 32 किमी.
2]पुढीलपैकी कोणते विधान व्यस्त चलनाचे नाही.?
1)काम पूर्ण होण्यास लागणारे दिवस व काम करणाऱ्या मजुरांची संख्या.
2)मुलांची संख्या आणि ठराविक बक्षिसाची रक्कम वाटताना प्रत्येक मुलाला मिळणारी बक्षिसाची रक्कम.
3)वाहनात भरलेले पेट्रोल व त्याची किंमत.
4)हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ.
उत्तर : (3)
वाहनात भरलेले पेट्रोल व त्याची किंमत. हे उदाहरण सम चलनाचे आहे.
पेट्रोल जास्त भरले तर किंमत जास्त होते.
पेट्रोल कमी भरले तर किंमत कमी होते.
3] जर 30 मजुरांना एक भिंत बांधण्यास 24 तास लागतात,तर 60 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील?
1) 12 2) 100 3) 48 4) 36
उत्तर : (1)
मजुरांची संख्या(m) व भिंत बांधण्यास लागणारे तास (t) यांमध्ये व्यस्त चलन आहे.
सोपी पद्धत :
व्यस्त चलनात गुणाकार स्थिर असतो.
m1 × t1 = m2 × t2
m1= 30, t1=24, t2= 60 ठेवू
30 × 24 = m2 × 60
720 = m2 × 60
720/60 = m2
12 = m2
m2 = 12
4]अशोक एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. अमित तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? (2018-19)
1) 12 2) 10 3) 15 4) 16
उत्तर : (1)
सोपी पद्धत :
A एक काम x दिवसात पूर्ण करतो. B तेच काम y दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून तेच काम xy/x+y दिवसात पूर्ण करतात.
दोघांना मिळून तेच काम करण्यास लागणारे दिवस
= xy / x+y
x=20, y= 30 ठेवू
= 20×30 / 20+30
= 600/50
= 12
5] 600 किमी अंतर जाण्यासाठी एसटीला ताशी 50 वेगाने 12 तास लागतात. तर तेच अंतर ताशी 75 किमी वेगाने येण्यासाठी किती तास लागतील?
1) 6 तास 2) 8 तास 3) 4 तास 4) 5 तास
उत्तर : (2)
वेग व वेळ यात व्यस्त चलन आहे.
सोपी पद्धत :
व्यस्त चलनात गुणाकार स्थिर असतो.
v1 × t1 = v2 × t2
v1 = 50, t1 = 12, v2 = 75 ठेवू.
50 × 12 = 75 × t2
600 = 75 l× t2
600/ 75 = t2
8 = t2
t2 = 8
उत्तर 👇
General Knowledge - आजचा प्रश्न
✍️ आणि हा लेख उपयुक्त वाटला तर जरूर शेअर करा.
लेखक: Ganit Expert Hovuya
श्री.जे.एम.पाटील
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:8329467192
📱 WhatsApp: 9405559874
📌 स्पर्धा परीक्षांसाठी गणित मार्गदर्शन
अजून अशाच उपयुक्त माहितीकरिता भेट द्या
https://ganitexperthovuya.blogspot.com
धन्यवाद


Exxlent
Ajay Patil | April 30, 2021 at 7:11 PMउत्तम
जयसिंग पाटील | August 20, 2021 at 11:07 AM