ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्याची साधन शोधण्याची गरज असते.
चक्रवाढ व्याजाने - रास काढण्याच्या सूत्राचे उपयोजन
(Application of formula for Amount of compound interest )
चक्रवाढ व्याजाने - रास काढण्याच्या सूत्राचा उपयोग दैनंदिन जीवनातील इतर क्षेत्रातील उदाहरणे सोडविण्यासाठीही करता येतो. जसे लोकसंख्येतील वाढ, वाहनाची दरवर्षी कमी होणारी किंमत.
एखाद्या शहराची लोकसंख्या दरवर्षी वाढते.काही काळानंतर नंतर वाढणारी लोकसंख्या काढण्यासाठी चक्रवाढ व्याजाने रास काढण्याच्या सूत्राचा उपयोग होतो. वाढणाऱ्या लोकसंख्येच्या वाढीचा दर R हा धन घेतात.
एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिची किंमत खरेदीच्या किंमतीपेक्षा कमी होते. कमी होणाऱ्या किंमतीला घट किंवा घसारा (depreciation) असे म्हणतात. काही काळानंतर कमी झालेली किंमत काढण्यासाठी चक्रवाढ व्याजाने - रास काढण्याच्या सूत्राचा उपयोग होतो. वस्तूची किंमत कमी होत असल्याने घसाऱ्याचा (घटीचा दर) R हा ऋण घेतात.
1) 46340 2) 46240 3) 46140 4) 46540
उत्तर : (1)
A = P ( 1 + R/100)ⁿ
A = 2015 ची लोकसंख्या =?
P = 2012 ची लोकसंख्या = 1,40,000
R = लोकसंख्या वाढीचा दर =10%
वाढणाऱ्या लोकसंख्येच्या वाढीचा दर R हा धन घेतात.
n = 3
वरील किंमती सूत्रात ठेवू.
A = P ( 1 + R/100)ⁿ
= 1, 40, 000 ( 1 + 10/ 100 )³
= 1, 40, 000 ( 110/ 100 )³
= 1, 40, 000 ( 11/ 10)³............. अंशाला व छेदाला 10 ने भागून
= 1, 40, 000 × 1331/1000
= 140 × 1331............. अंशाला व छेदाला 1000ने भागून
= 186340
A = 2015 ची लोकसंख्या = 186340
2015 ची वाढलेली लोकसंख्या = 186340 - 140000
= 46340
उत्तर : (2)
A = P( 1 + R/100)ⁿ
P = 50000 रु.
R = द. सा. द. शे. 5 घसाऱ्याचा (घटीचा दर) R = -5
n = 2 वर्ष.
वरील किंमती सूत्रात ठेवू.
A = 50000( 1 - 5/100 )²
A = 50000( 95/100 )²
A = 50000 × 95/100 × 95/100
A = 50000 × 95× 95/10000
A = 5 × 95 × 95.............. अंशाला व छेदाला 10000 ने भागून
A = 5 × 9025
A = 45125
किंमतीतील घट = 50000 - 41125
= 4875
समजा शेकडा घट x
x / 100 = 4875 / 50000
x = ( 4875 / 50000 ) × 100
x = 487500 / 50000
x = 4875 / 500........... अंशाला व छेदाला 100 ने भागून
x = 195/20........... अंशाला व छेदाला 25 ने भागून
x = 39/4
शेकडा घट x = 39/4
1) 43740 2) 43640 3) 43240 4) 43540
उत्तर : (1)
A = P( 1 + R/100)ⁿ
P = 60000 रु.
R = द. सा. द. शे. 10 घसाऱ्याचा (घटीचा दर) R = -10
n = 3 वर्ष.
वरील किंमती सूत्रात ठेवू.
A = 60000( 1 - 10/100 )3
A = 60000( 90/100 )3
A = 60000( 9/10 )3
A = 60000 × 9/10× 9/10 ×9/10
A = 60000 × 9× 9×9/1000
A = 60 × 9 × 9× 9............. अंशाला व छेदाला 1000ने भागून
A = 60 × 729
A = 43740
4] शहराच्या एका उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते. आजची व दोन वर्षानंतरची लोकसंख्या अनुक्रमे 16000 व 17640 असतील, तर लोकसंख्या वाढीचा दर काढा.
1) द. सा. द. शे. 8 2) द. सा. द. शे. 12
3) द. सा. द. शे. 10 4) द. सा. द. शे. 5
A = P ( 1 + R/100)ⁿ
A = 2 वर्षानंतरची लोकसंख्या = 17640
P = आजची लोकसंख्या = 16000
R = लोकसंख्या वाढीचा दर =?
वाढणाऱ्या लोकसंख्येच्या वाढीचा दर R हा धन घेतात.
n = 2
वरील किंमती सूत्रात ठेवू.
A = P ( 1 + R/100)ⁿ
17640 = 16000 ( 1 + R/ 100 )²
17640 / 16000 = ( 1 + R/ 100 )²
1764 / 1600 = (1 + R/ 100 ]²
42 / 40 = 1+ R/100.. ................. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ
21 /20 = 1+ R / 100
21 /20 - 1 = R / 100
21 / 20 - 20 / 20 = R / 100
(21 - 20 ) /20 = R /100
1 / 20 = R /100
100 × 1 / 20 = R
5 = R
R = लोकसंख्या वाढीचा दर = द. सा. द. शे. 5
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद

S
Anonymous | December 30, 2022 at 7:29 PM