ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते, त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.
घन संख्या मालिका
NMMS, NTSE व स्कॉलरशिप या परीक्षांसाठी एक महत्त्वाचा विषय म्हणजे मानसिक क्षमता कसोटी /चाचणी (Mental Ability Test ). या विषयांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विद्यार्थ्यांची तर्कनिष्ठ विचार करण्याची क्षमता, निरीक्षण क्षमता, आकलन शक्त्ती व विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता तपासली जाते.
यामध्ये संख्या मालिका (Number series) म्हणजेच क्रमागत येणारी संख्या कोणती यावर आधारित प्रश्न असतात . या प्रकारचे प्रश्न कमीत कमी तीन व जास्तीत जास्त पाच प्रश्न विचारले जातात . संख्या मालिकेवरील प्रश्न सोडविण्यासाठी गणिती ज्ञान महत्त्वाचे आहे. गणितातील संख्या ज्ञान,वर्ग करणे, घन करणे इत्यादी क्रियांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. बहुपर्यायी प्रश्न सोडविण्याची सवय लागणे जरूर आहे. त्यासाठी अनेक प्रकारचे प्रश्न अनेक वेळा सोडवून सराव करणे आवश्यक आहे.
घन संख्या मालिका |Cube Series | gahn snkhya malika | यावर आधारित सामान्य बौद्धिक क्षमता कसोटी मध्ये प्रश्न विचारले जातात.त्या बद्दल माहिती घेऊ.
संख्यांचे घन माहित असतील तर घन संख्या मालिकेवरील प्रश्न सोडविता येतात.
उदा. 1] 1, 27,125,........
उत्तर : 343
संख्यांचे निरीक्षण केल्यास लक्षात येते की, क्रमवार विषम संख्यांचे घन आहेत.
1³ = 1
3³ = 27
5³= 125
7³ = 343
उदा. 2] 0, 6, 24,60,.........
उत्तर : 120
सूत्र : a³ - a
संख्येचा घन - संख्या
1³ - 1 = 1-1=0
2³ - 2= 8 -2=6
3³ - 3= 27-3=24
4³ - 4= 64 -4=60
5³ -5= 125 -5=120
आपल्याला या प्रकारच्या प्रश्नांचा सराव होण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. लिंक क्लिक करा. त्या मध्ये प्रश्न दिलेले आहेत.
ते प्रश्न सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करावा.
1) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.
3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit होईल .
4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे .
4) त्यानंतर आपले किती प्रश्न (question ) बरोबर सोडवले आहेत ते समजेल व चुकलेल्या प्रश्नाच्या ( questions ) उत्तराचे स्पष्टीकरण (explanation) Feedback मध्ये आपल्याला सादर होईल.
5) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल त्या पर्यायावर click करावे .
पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा questions स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी ) एंटर करा.
खालील लिंक क्लिक करा.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद

Post a Comment