एकाच प्रकारे विचार करून
वेगवेगळे problem सुटत नाहीत
Think differrent.
समांतरभुज चौकोन ( Parallelogram)
व्याख्या : ज्या चौकोनाच्या संमुख भुजा परस्परांना समांतर असतात, त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणतात.
समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म :
1) संमुख भुजा समांतर असतात.
बाजू AB || बाजू CD
बाजू AD || बाजू BC
2) संमुख भुजा एकरूप (समान लांबीच्या ) असतात.
बाजू AB ≅ बाजू CD
बाजू AD ≅ बाजू BC
3) समांतरभुज चौकोनाचे संमुख कोनांची मापे समान असतात.
m ∠ BAD ≅ m ∠BCD
m ∠ABC ≅ m ∠ADC
4) समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात.
5) समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप नसतात.
6) समांतरभुज चौकोनाचे कोणतेही दोन लगतचे कोन पूरक असतात.
m ∠ BAD + m ∠ADC = 180°
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] समांतरभुज चौकोन PQRS मध्ये m ∠Q= 130° तर m ∠P = किती? (2013-14)
1) 130° 2) 50° 3) 180° 4) 80°
उत्तर : (2)
समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात.
m ∠P + m∠Q = 180°
m ∠P + 130° = 180°
m ∠P = 180° - 130°
m ∠P = 50°
3) समांतरभुज चौकोनाचे संमुख भुजा एकरूप असतात.
4)समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.
उत्तर : (2)
2) समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप नसतात.
3] चौकोन ABCD समांतरभुज असून ∠A= x° आणि ∠B = 3x°+ 20° तर ∠C व ∠D यांची मापे किती ?
1) ∠C = 40°, ∠ D = 140°
2) ∠C = 30°, ∠ D = 150°
3) ∠C = 70°, ∠ D = 110°
4) ∠C = 105°, ∠ D = 75°
उत्तर : (1)
समांतरभुज चौकोन ABCD ची कच्ची आकृती काढू.
समांतरभुज चौकोनाचे कोणतेही दोन लगतचे कोन पूरक असतात.
m ∠ A + m ∠B = 180°
x° + 3x°+ 20° = 180°
4x°+ 20° = 180°
4x° = 180° - 20°
4x° = 160°
x° = 160° / 4
x° = 40°
∠A= x° = 40°
∠B = 3x°+ 20° = 3(40)°+ 20°
= 120 + 20
= 140°
समांतरभुज चौकोनाचे संमुख कोनांची मापे समान असतात.
∠A = ∠C = 40°
∠B =∠D = 140°
4] चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन असून ∠A= 60° आहे, तर ∠C = किती?
1) 120° 2) 30° 3) 60° 4) 180°
उत्तर : (3)
समांतरभुज चौकोनाचे संमुख कोनांची मापे समान असतात.
∠ C = ∠A= 60°
5] चौकोन MNOP मध्ये MN = OP = 5 आणि NO = MP = 8 तर चौकोन MNOP हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे?
1) आयत 2) समलंब चौकोन 3) पतंग 4) समांतरभुज चौकोन
उत्तर : (4)
MN = OP = 5 आणि NO = MP = 8
संमुख भुजा एकरूप (समान लांबीच्या ) आहेत. म्हणून चौकोन MNOP हा समांतरभुज चौकोन आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद




A
Anonymous | October 21, 2024 at 7:58 PM