कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा”
त्रिकोणाचे क्षेत्रफळ ( Area of a Triangle)
1) त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1/2 × पाया × उंची
2) त्रिकोणाची उंची दिली नसेल परंतु त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी दिली असेल तर
ABC त्रिकोणाच्या बाजू जर a, b, c असतील तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे हिरोचे सूत्र (Heron's Formula)
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √s(s-a)(s-b)(s-c)
A(ΔABC) =√s(s-a)(s-b)(s-c)
s = अर्धपरिमिती = ( a+b+c) / 2
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 84 चौ. सेमी हे त्याच्या पायाच्या 12 पट आहे. तर त्रिकोणाची उंची किती? (2017-18)
1) 24सेमी 2) 12सेमी 3) 16सेमी 4) 18सेमी
उत्तर : (1)
पाया × 12 = क्षेत्रफळ
पाया × 12 = 84
पाया = 84 / 12
पाया = 7 सेमी
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1/2 × पाया × उंची
84 = 1/2 × 7 × उंची
84 = 7/2 × उंची
84 × 2 / 7 = उंची
24 = उंची
उंची = 24 सेमी.
2] एका चौरसाकृती कागदाला त्याच्या कर्णातून एक घडी घातली असता त्या कर्णाची लांबी 12 सेमी होते, तर या घडीमुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. (2009-10)
1) 36 चौ. सेमी. 2) 72 चौ. सेमी.
3) 144 चौ. सेमी. 4) 48 चौ. सेमी.
उत्तर : (1)
कच्ची आकृती काढू.
चौरसाची बाजू = कर्ण /√2
चौरसाची बाजू = 12/√2
AB = BC = 12/√2
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1/2 × पाया × उंची
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1/2 × AB × BC
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1/2 × 12/√2 ×12/√2
= 12×12 / 2 × √2×√2
= 12×12/ 2×2
= 36 चौ. सेमी.
3] (ΔLMN) मध्ये l(LM) =60 मी. l(MN) = 60 मी. आणि ΔLMN ची अर्धपरिमिती 108 मी आहे. तर l(LN) =?
1) 60 मी. 2) 66 मी. 3) 96 मी. 4)120 मी.
अर्धपरिमिती = ( a+b+c) / 2
108 = [l(LM) + l(MN) +l(LN)] / 2
108 = [ 60 + 60+ l(LN)] / 2
108 × 2 = [ 60 + 60+ l(LN)]
216 = 120 + l(LN)
216 - 120 = l(LN)
96 = l(LN)
4] एका त्रिकोणाच्या बाजू 9 सेमी, 40 सेमी, व 41 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
1) 280 चौ. सेमी. 2) 380 चौ. सेमी.
3) 180 चौ. सेमी. 4) 480 चौ. सेमी.
उत्तर : (3)
a = 9, b = 40 , c = 41
s = अर्धपरिमिती = ( a+b+c) / 2
s = (9 + 40 + 41)/ 2
S = 90 / 2
S = 45
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √s(s-a)(s-b)(s-c)
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √45(45-9)(45-40)(45-41)
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √45×36×5×4
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √225×36××4
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 15 × 6 × 2
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 180 चौ. सेमी.
5]समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या बाजू 13 मी. व 14 मी. आहेत. एका कर्णाची लांबी 15 मी. असेल तर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.
1) 168 चौ. मी 2) 158 चौ. मी
3) 178 चौ. मी 4) 188 चौ. मी
उत्तर : (1)
समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा एकरूप असतात.
AD= BC = 13
AB =DC =14
A(ΔADC) मध्ये
AD= 13, DC =14, AC = 15
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √s(s-a)(s-b)(s-c)
A(ΔADC) =√s(s-a)(s-b)(s-c)
A(ΔADC) =√21(21-13)(21-14)(21-15)
A(ΔADC) =√3×7×2×2×2×7×2×3
A(ΔADC) =√3×3×7×7×2×2×2×2
A(ΔADC) =3×7×2×2
A(ΔADC) =84 चौ. मी
ΔABC मध्ये
BC = 13
AB =14
AC = 15
ΔABC च्या बाजूंची मापे व ΔADC च्या बाजूंची मापे समान आहेत.
समांतरभुज चौकोनाचा कर्ण दोन एकरूप त्रिकोणात विभाजन करतो.
A(ΔADC) =A(ΔABC) = 84 चौ. मी
समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = A(ΔADC) + A(ΔABC) =84 + 84 = 168 चौ. मी
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद




उत्तम
जयसिंग पाटील | May 27, 2021 at 12:17 PM