खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते, सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.
समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ (Area of a Trapezium)
समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ |Area of a Trapezium|samlanb choukonache shetrfl|या घटकात समलंब चौकोनाची व्याख्या,समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ,समलंब चौकोनाची उंची,समांतर बाजूंची बेरीज किंवा एका बाजूची लांबी काढण्यासंबंधी सूत्रे व उदाहरणे याचा अभ्यास करूया.
समलंब चौकोन : ज्या चौकोनाच्या संमुख बाजूंची एक आणि एकच जोडी समांतर असते. त्या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात.
रेख AD || रेख BC
1) समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ (A) = 1/2 × समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज × उंची
A= 1/2 × ( a + b ) × h
2) समलंब चौकोनाची उंची ( h) = 2 × क्षेत्रफळ /समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज
समलंब चौकोनाची उंची ( h) = 2A / (a+b)
3) समलंब चौकोनाची उंची ( h) = समांतर भुजांमधील अंतर
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] समलंब चौकोनाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
a) संमुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात.
b) संमुख बाजूंची एक जोडी समांतर नसते.
c) संमुख बाजूंची एक आणि एकच जोडी समांतर असते.
d) समलंब चौकोनाची उंची ( h) = समांतर भुजांमधील अंतर
1) a, b, व c 2) b, c व d 3) फक्त्त c 4) a, b, व d
उत्तर : (2)
2] एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 9.5 सेमी. व 11.5 सेमी. त्याची उंची 7.4 सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?
1) 74 सेमी. 2) 70.4 चौ. सेमी. 3) 74 चौ. सेमी. 4) 7.4 चौ. सेमी.
उत्तर : (3)
समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ (A) = 1/2 × समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज × उंची
A = 1/2 × (9.5+11.5 ) × 7.4
A = 1/2 × 20 ×7.4
A = 10 ×7.4
A = 74 चौ. सेमी.
3] एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 7 सेमी. व 8 सेमी. त्या चौकोनाचे क्षेत्रफळ 45 चौ. सेमी असेल तर समलंब चौकोनाची उंची किती?
1) 7.5 सेमी. 2) 15 सेमी. 3) 6 सेमी. 4) 6.5 सेमी.
उत्तर : (3)
समलंब चौकोनाची उंची ( h) = 2 × क्षेत्रफळ /समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज
h = (2 × 45) / (7+8)
h = 90 / 15
h = 6 सेमी.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद




Post a Comment