विद्या विनयेन शोभते ॥
स्थानिक किंमत ( Place Value )
संख्येतील प्रत्येक अंकाची किंमत दोन प्रकारे ठरवली जाते.
1) दर्शनी किंमत (Face Value) :
संख्येतील प्रत्येक अंकाचे एककस्थानी जे मूल्य असेल ती त्या अंकाची दर्शनी किंमत.
उदाहरणार्थ :
384 मधील 8 ची दर्शनी किंमत 8
384 मधील 3 ची दर्शनी किंमत 3
2) स्थानिक किंमत (Place Value )
स्थानिक किंमत म्हणजे संख्येतील अंकाच्या स्थानानुसार ठरणारी किंमत.
उदाहरणार्थ :
59478 या संख्येतील अंकांची स्थाने -
स्थान:दशसहस्त्र सहस्त्र शतक दशक एकक
5 9 4 7 8
अंकाची स्थानिक किंमत = अंक × स्थानाची किंमत
9 ची स्थानिक किंमत = 9 × 1000
= 9000
किंवा
पूर्णांक संख्येतील अंकाची स्थानिक किंमत काढतानाअंकानंतर जितके अंक आहेत तेवढे शून्य त्या अंकानंतर लिहितात.
384 मधील 8 ची स्थानिक किंमत 80.
384 मधील 3 ची स्थानिक किंमत 300.
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] 85472 या संख्येतील 8 व 4 ची स्थानिक किंमत अनुक्रमे किती?
1) 8000 व 400 2) 80000 व 400
3) 400 व 8000 4) 400 व 80000
उत्तर : (2)
पूर्णांक संख्येतील अंकाची स्थानिक किंमत काढताना त्या अंकानंतर जितके अंक आहेत तेवढे शून्य त्या अंकानंतर लिहितात.
8 नंतर 4 अंक आहेत
∴ 8 नंतर 4 शून्ये लिहितात.
8ची स्थानिक किंमत = 80000
4 नंतर 2 अंक आहेत
∴ 4 नंतर 2 शून्ये लिहितात.
4 ची स्थानिक किंमत = 400
2] 480123 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?
1) 200 2) 2,000 3) 20,0000 4) 2,00,000
उत्तर : (3)
4 ची स्थानिक किंमत = 400000
2 ची स्थानिक किंमत = 20
20 × x = 400000
x = 400000 /20
x = 20000
3] 78 (4+5A) 32 ही पाच अंकी संख्या 78932 या पाच अंकी संख्येबरोबर आहे. तर A = किती?
1) 4 2) 1 3) 5 4) 9
उत्तर : (2)
78 (4+5A) 32 = 78932
4+5A = 9 ..... शतक स्थानचा अंक
5A = 9 - 4
5A = 5
A = 5 / 5
A = 1
4] 473551 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती?
1) 7 × 10³ 2) 7 × 10⁵
3) 7 × 10⁴ 4) 7 × 10⁻⁴
उत्तर : (3)
पूर्णांक संख्येतील अंकाची स्थानिक किंमत काढतानाअंकानंतर जितके अंक आहेत तेवढे शून्य त्या अंकानंतर लिहितात.
473551 या संख्येत
7 नंतर 4 अंक आहेत
∴ 7 नंतर 4 शून्ये लिहितात.
7 ची स्थानिक किंमत = 70000
= 7 × 10000
= 7 × 10⁴
5] ( 7+ 4A) व ( 5 +2B ) हे 98537 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत, तर A व B च्या किंमती कोणत्या?
1) -1, 0.5 2) 0.25, -1 3) -0.25, -1 4) -1/4, 1
उत्तर : (2)
संख्येतील सहस्त्र स्थानचा अंक = 8
सहस्त्र स्थानचा अंक = 7+ 4A
7 + 4A = 8
7 + 4A = 8
4A = 8 - 7
4A = 8 - 7
4A = 1
A = 1/ 4
A = 0.25
संख्येतील दशक स्थानचा अंक = 3
दशक स्थानचा अंक = 5+ 2B
5+ 2B = 3
2B = 3 - 5
2B = - 2
B = - 2/ 2
B = - 1
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद
खूप छान
Anonymous | June 26, 2023 at 6:50 PMThanks
Ganit Expert Hovuya -स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन | July 22, 2023 at 10:55 PM