कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे
इष्टिकाचिती(Cuboid)
आयताकार पायावर तयार झालेल्या चितीला इष्टिकाचिती म्हणतात.
इष्टिकाचितीला एकूण पृष्ठभाग = 6
इष्टिकाचितीला एकूण आयताकृती पृष्ठभाग = 6
इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ =2(लांबी × रुंदी + रुंदी × उंची + उंची ×लांबी )
= 2(lw + wh + hl)
इष्टिकाचितीचा कर्ण = √(l²+w²+h²)
इष्टिकाचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची
= l × w × h
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] एका मोबाइलच्या खोक्याची लांबी 18 सेमी, रुंदी 10.5 सेमी, व उंची 7.2 सेमी आहे. तर त्या खोक्याचे घनफळ किती?
1)1360.8 सेमी 2) 136.08 घ.सेमी
3)1360.8 घ.सेमी 4)13608 घ.सेमी
उत्तर : (3)
खोक्याचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची
= 18 × 10.5× 7.2
= 1360.8 घ.सेमी
2] एका विटेचे घनफळ 1500 cm³ आहे. विटेची लांबी 20 सेमी, रुंदी 10 सेमी असल्यास विटेची जाडी (उंची) किती?
1) 75 मिमी 2) 4.5 सेमी
3) 5 सेमी 4) 7.5 सेमी
उत्तर : (1) व (4)
विटेचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची (जाडी)
1500 = 20 × 10 × जाडी
1500 = 200 × जाडी
1500/ 200 = जाडी
15 / 2 = जाडी
7.5 = जाडी
जाडी = 7.5 सेमी
जाडी = 7.5× 10 मिमी
जाडी = 75 मिमी
3] एका पाण्याच्या टाकीची लांबी 6 मीटर, रुंदी 2 मीटर व उंची(खोली )0. 5 मीटर आहे. तर त्या टाकीत पाणी किती लीटर मावेल?
1) 600 लीटर 2) 6000 लीटर
3) 60000 लीटर 4) 600000 लीटर
उत्तर : (2)
6 मीटर = 6 ×100 = 600 सेमी
2मीटर = 2 ×100 = 200 सेमी
0.5 मीटर = 0.5 ×100 = 50 सेमी
टाकीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची
= 600 × 200× 50
= 6000000 घ.सेमी
1000 घ.सेमी = 1 लीटर.
6000000 घ.सेमी = 6000000 ÷ 1000 लीटर
= 6000 लीटर.
4] एका धातूच्या पेटीची बाहेरून लांबी 5.5 मीटर, रुंदी 3 मीटर व उंची 1 मीटर आहे.त्या पेटीच्या बाहेरील सर्व पृष्ठ भागाला रंग दिलेला आहे. तर रंग दिलेले एकूण पृष्ठफळ किती?
1) 50 मीटर 2) 5 मीटर²
3) 50 मीटर² 4) 16.5 मीटर²
उत्तर : (3)
पेटीचे एकूण पृष्ठफळ = 2 (लांबी × रुंदी + रुंदी × उंची + उंची ×लांबी )
= 2(5.5×3 + 3×1 + 1×5.5)
= 2 ( 16.5 + 3 +5.5)
= 2 (25)
= 50 मीटर².
5] 4 मी लांबी, 3 मी उंची व 0.4 मी रुंदी असलेली एक भिंत बांधायची आहे. ही भिंत बांधण्यासाठी 20 सेमी लांबी,12 सेमी रुंदी व 10 सेमी उंचीच्या किती विटा लागतील?
1) 200 2) 20000 3) 4000 4) 2000
उत्तर : (4)
विटांची संख्या = भिंतीचे घनफळ ÷ एका विटेचे घनफळ
भिंतीचे घनफळ सेमी³ मध्ये घ्या.
विटांची संख्या = (4×100 × 3×100 × 0.4×100) ÷ (20×12×10)
विटांची संख्या = (400 × 300 × 40) ÷ (20×12×10)
विटांची संख्या = (4800000) ÷ (2400)
विटांची संख्या = 2000
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद
खूपच सुंदर मांडणी
Unknown | September 27, 2021 at 1:55 PMधन्यवाद सर