जर प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टी जवळ असतील तर अशक्य असे काहीच नसते.
सांख्यिकी (Statistics)
सांख्यिकी |Statistics |या प्रकरणावर NMMS व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नेहमी एक प्रश्न असतो. सांख्यिकी संबंधी प्राप्तांक, वारंवारता,मध्य /मध्यमान या संकल्पना महत्वाच्या आहेत .प्राप्तांक कमी असताना मध्यमान काढण्याचे सूत्र,अवर्गीकृत सारणीवरून मध्यमान काढणे सूत्र व उदाहरणे यांचा अभ्यास करूया.
महत्त्वाचे मुद्दे :
1) प्राप्तांक :दिलेल्या संख्यात्मक माहितीतील प्रत्येक संख्येस प्राप्तांक म्हणतात.
2) वारंवारता : प्राप्तांकांमध्ये एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दर्शविणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची वारंवारता म्हणतात.
2) सरासरी = सर्व प्राप्तांकांची बेरीज / एकूण प्राप्तांकांची संख्या
3)मध्य (Mean):
सरासरीलाच सांख्यिकीच्या परिभाषेत मध्य, मध्यमान, म्हणतात.
मध्य किंवा मध्यमान =सर्व नोंदींची बेरीज / एकूण नोंदी
किंवा
मध्य x̄ = सर्व प्राप्तांकांची बेरीज / एकूण प्राप्तांकांची संख्या
मध्य x̄ =∑ xᵢ / N ∑ xᵢ =सर्व प्राप्तांकांची बेरीज
N = एकूण प्राप्तांकांची संख्या
मध्य x̄ =(x1+ x2+ x3+....... .. +xn)/ N
येथे x1, x2, x3, ........ .. , xn हे प्राप्तांक,
N= एकूण प्राप्तांकांची संख्या.
4) अवर्गीकृत सारणीवरून मध्य काढणे :
मध्य x̄ = ∑ fᵢ × xᵢ / N
∑ fᵢ × xᵢ = fᵢ व xᵢ च्या गुणाकाराची बेरीज.
N = fᵢ ची बेरीज.
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] 5, 7, 8, 7, 8, 6, 5, 8, 7, 5, 7, 8, 5, 6, 8, 7, 5, 7, 7, 6 या सामग्रीत 7 या प्राप्तांकाची वारंवारता............... आहे. (2011-12)
1) 6 2) 5 3) 7 4) 8
उत्तर : (3)
प्राप्तांकांमध्ये एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दर्शविणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची वारंवारता म्हणतात.
7 हा प्राप्तांक 7 वेळा आलेला आहे.
∴ 7 या प्राप्तांकाची वारंवारता 7 आहे.
2]17, 21, 15, x, 30, 20, 35, 29, 33 या प्राप्तांकांचे मध्यमान 25 आहे. तर x ची किंमत किती? (2013-14)
1) 35 2) 40 3) 45 4) 25
उत्तर : (4)
मध्य x̄ = सर्व प्राप्तांकांची बेरीज / एकूण प्राप्तांकांची संख्या
25 = (17+21+15+x+30+20+35+29+33) ÷ 9
25 = (200+x) ÷ 9
25 × 9 = 200 + x
225 = 200 + x
225 - 200 = x
25 = x
3] एका वारंवारता सारणीमध्ये ∑ fᵢ xᵢ = 24240 आणि N =40 तर x̄(मध्य ) =? (2018-19)
1) 66 2) 660 3) 662 4) 606
उत्तर : (4)
मध्य x̄ = ∑ fᵢ × xᵢ / N
= 24240 / 40
= 2424 / 4................. अंशाला व छेदाला 10 ने भागून.
∴ मध्य x̄ = 606
4] x-3, x, x+3, x- 6, x+6 या पाच संख्यांची सरासरी 49 आहे. तर त्या संख्येतील सर्वात लहान संख्या कोणती? (2016-17)
1) 40 2) 46 3) 43 4) 55
उत्तर : (2)
सरासरी = सर्व प्राप्तांकांची बेरीज / एकूण प्राप्तांकांची संख्या
49 = (x-3+ x+ x+3 + x- 6+ x+6) / 5
49 = 5x / 5
49×5 = 5x
245 = 5x
245/5 = x
49 = x
∴ x = 49
सर्वात लहान संख्या = x - 3
= 49 - 3
∴ सर्वात लहान संख्या = 46
5] खालीलपैकी असत्य विधान कोणते?
1) वारंवारता fᵢ ने दर्शवली जाते.
2) N = ∑ fᵢ
3) प्राप्तांक xᵢ ने दर्शवितात.
4) मध्य x̄ = fᵢ × xᵢ / N
उत्तर : (4)
मध्य x̄ = ∑ fᵢ × xᵢ / N
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• धन्यवाद

उत्तम
जयसिंग पाटील | May 8, 2021 at 8:32 AMउत्तम
जयसिंग पाटील | May 8, 2021 at 8:33 AM