विभाजत्येच्या कसोट्या
(Tests of Divisibility )
एखाद्या भाज्याला भाजकाने निःशेष भाग जात असेल ( बाकी शून्य उरत असेल ) तर त्या भाज्याला विभाज्य व भाजकाला विभाजक म्हणतात.
उदा. 70 ला 14 ने निःशेष भाग जातो.
∴ 70 हे विभाज्य व 14 हा विभाजक आहे.
50 ला 1,2,5,10,25,50 ने निःशेष भाग जातो.
∴ 50 चे सर्व विभाजक : 1,2,5,10,25,50.
विभाजत्येच्या कसोट्या (Tests of Divisibility ):
1) 1 ची कसोटी :
प्रत्येक संख्येला 1 ने निःशेष भाग जातो.
2) 2 ची कसोटी :
संख्येच्या एकक स्थानी 0,2,4,6,8 यांपैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येस 2 ने निःशेष भाग जातो.
उदा. 12, 346.
3) 3 ची कसोटी :
संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निःशेष भाग जात असेल तर त्या संख्येस 3 ने निःशेष भाग जातो.
उदा. 45
4) 4 ची कसोटी :
संख्येतील शेवटच्या दोन अंकानी तयार होणाऱ्या संख्येस 4 ने निःशेष भाग जात असेल तर त्या संख्येस 4 ने निःशेष भाग जातो.
उदा. 128
संख्येच्या शेवटी दोन शून्ये असतात त्या संख्येस 4 ने निःशेष भाग जातो.
उदा. 300
5) 5 ची कसोटी :
संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 यांपैकी एखादा अंक असेल,तर त्या संख्येस 5 ने निःशेष भाग जातो.
उदा. 235, 3580
6) 6 ची कसोटी :
सम संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निःशेष भाग जात असेल तर त्या संख्येस 6 ने निःशेष भाग जातो.
उदा. 942
7) ची कसोटी :
संख्येतील एकक स्थानची दुप्पट ही उरलेल्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून वजा केली असता वजाबाकी शून्य किंवा वजाबाकीला 7 ने निःशेष भाग जात असेल तर त्या संख्येस 7 ने निःशेष भाग जातो.
उदा. 1568
संख्येतील एकक स्थानची दुप्पट = 8 × 2 = 16
उरलेल्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून वजा = 156 - 16 = 140
140/ 7 = 20
वजाबाकीला 7 ने निःशेष भाग जातो.
∴ 1568 ला 7 ने निःशेष भाग जातो.
8) 8 ची कसोटी :
संख्येतील शेवटच्या तीन अंकानी तयार होणाऱ्या संख्येस 8 ने निःशेष भाग जात असेल तर त्या संख्येस 8 ने निःशेष भाग जातो.
उदा. 9128
संख्येच्या शेवटी तीन शून्ये असतात त्या संख्येस 8 ने निःशेष भाग जातो.
उदा. 3000
9) 9 ची कसोटी :
संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने निःशेष भाग जात असेल तर त्या संख्येस 9 ने निःशेष भाग जातो.
उदा. 7344
10) 10 ची कसोटी :
संख्येच्या एकक स्थानी 0 अंक असेल,तर त्या संख्येस 10 ने निःशेष भाग जातो.
उदा. 90, 3580
11) 11 ची कसोटी :
संख्येच्या समस्थानी असलेल्या अंकांची बेरीज व विषमस्थानी असलेल्या अंकांची बेरीज यातील फरक 0 किंवा 11 च्या पटीत असेल तर त्या संख्येस 11ने निःशेष भाग जातो.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद

Post a Comment